15920
मालेगाव : उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना खासदार शोभा बच्छाव
-----
मालेगाव येथे प्लॅस्टिक पार्क उभारावे
-------
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे उद्योगमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तेसवा
मालेगाव, ता. १८ : शहरात प्लॅस्टिक कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे प्लॅस्टिक पार्क उभारावा यासाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटून निवेदन दिले.
शहरात यंत्रमागानंतर प्लॅस्टिक उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. येथे ३५० प्लॅस्टिक कारखानदार आहेत. त्यांच्यासाठी येथे सुमारे २०० एकर जागा द्यावी अशी मागणी मालेगाव प्लॅस्टिक उत्पादक संघाकडून केली जात आहे. महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने प्लॅस्टिक पार्क व्हावा असे प्रयत्न सुरु आहेत. प्लॅस्टिक पार्क सुरु केल्यास येथील उद्योगाला गती मिळेल. महिलांसह नागरीकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्य स्तरावर प्लॅस्टिक उद्योग क्षेत्र म्हणून मालेगावची ओळख निर्माण होईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासून कारवाई करावी असे पत्रकात नमूद केले आहे. यावेळी मालेगावचे युसूफ हाजी नॅशनलवाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.