घात - अपघात

घात - अपघात
Published on
चिंचविहिर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या मालेगाव : चिंचविहिर (ता. नांदगाव) येथील गोकुळ एकनाथ मोरे (वय ३०) यांनी १८ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या पूर्वी दापूरे (ता. मालेगाव) येथील सासरे शरद धाकू मोरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. शरद मोरे यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉ. अंकिता पवार यांनी मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पळासदरे येथे तरुणाचा मृत्यू मालेगाव : पळासदरे (ता. मालेगाव) येथील जितेंद्र रविंद्र पगारे (वय ३५) यांची १८ सप्टेंबरला सकाळी दहाला अचानक प्रकृती बिघडली. नातेवाईक योगेश पगारे यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉ. अंकिता पवार यांनी मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. लाकडी दांडक्याने पती-पत्नीला मारहाण मालेगाव : साकुरी निं. शिवारात बैल शेतात आल्याच्या कारणावरून पती-पत्नीला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली. सविता विकास ठोके व त्यांचे पती विकास ठोके शेतात काम करीत असताना पवन नाना शिल्लक यांचा बैल शेतात आला. ठोके दाम्पत्याने पवन यांना बैल त्यांच्या शेतात घेऊन जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने पवनने दोघांना दांडक्याने मारहाण केली. आरडाओरड ऐकून चेतन नाना शिल्लक व एक महिला घटनास्थळी आले. त्यांनीही दाम्पत्याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पवनने ‘आमच्या नादी लागल्यास जीवे मारू,’ अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोन दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी मालेगाव : चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात दोन दुचाकींच्या धडकेत चौघे जखमी झाले. मोहम्मद मोईन शेख बिस्मिल्ला मोमीन (वय २४, रा. अकराहजार खोली) व त्याचा मित्र शाहरुख युसूफ खान हे बजाज पल्सरवरून मालेगावकडे येत होते. शनी मंदिराजवळ चढणीच्या वळणावर समोरून आलेल्या मुकेश लक्ष्मण अंदुरे (रा. अजंग) यांच्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.अपघातात मोहम्मद मोईन, शाहरुख युसूफ, मुकेश अंदुरे आणि त्यांचा मित्र भूषण राजेंद्र शिरसाठ (रा. द्याने) हे चौघे जखमी झाले. तालुका पोलिस ठाण्यात मुकेश अंदुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धान्य वाटपावरुन दाम्पत्याला मारहाण गिलाणे (ता. मालेगाव) येथील स्वस्त धान्य दुकानात रेशनचे तांदूळ व गहू वाटप सुरू असताना दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली. छाया पोपट सूर्यवंशी (वय ३२) व त्यांचे पती पोपट सूर्यवंशी हे धान्य वाटप करीत होते. त्या वेळी रविंद्र ज्ञानदेव आहिरे, अजय ज्ञानदेव आहिरे, पंकज ज्ञानदेव आहिरे, सचिन ज्ञानदेव आहिरे, कुणाल सुनील निकम व इतर दोघे दुकानात आले.धान्यात मातीचे खडे असल्याच्या कारणावरून त्यांनी छाया व पोपट यांना शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठ्या व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २० सप्टेंबरला सकाळी साडेनऊला हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com