पान-३ मेन
फोटो -16063
भगवान गोर्डे
-----
फोटो-16064
सायतरपाडे ः येथे पंचनामे करताना सहाय्यक कृषी अधिकारी प्रमोद फुलपगर. शेजारी महसूल विभागाचे अधिकारी.
------
मालेगाव तालुक्यात ५० हजार हेक्टरवर दुष्काळाचे पंचनामे
७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस; पावसाअभावी पिकांचे नुकसान
जलील शेख : सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ८ : राज्यात २५ सप्टेंबरला शासनाने २६५ तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे. यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात सुमारे एक लाख १८ हेक्टर जमिनीचे क्षेत्र आहे. यात ९१ हजार हेक्टर खरिपाचे लागवडी क्षेत्र आहे. मालेगाव तालुक्यात खरिपात ५८ हजार हेक्टरवर मक्याची लागवड झाली. मात्र जुलैमध्येच पाऊस पडला नाही. पूर्ण पिके खराब झाली. त्यामुळे ५० हजार हेक्टरपर्यंत महसूल व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले आहेत.
मालेगाव तालुक्यात १३ मंडळ आहेत. या मंडळांमधील क्षेत्रात मका, कापूस, बाजरी, ज्वारी, मुग, तूर, उडीद, भुईमूग, सोयाबीन याची लागवड केली जाते. यंदा जूनच्या शेवटी व जुलैमध्ये पाऊस पडला. त्यानंतर मालेगाव परिसरात पाऊस झाला नाही. जून ते जुलैदरम्यान मालेगावसह परिसरात ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला. त्याचबरोबर जून ते सप्टेंबरपर्यंत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने, पावसाचा खंड मोठा असल्याने पिके करपू लागली. पिकांची वाढ खुंटली, मका, ज्वारी, बाजरीची कणसे पूर्णपणे भरली नाहीत. पाणी नसल्याने त्याच ठिकाणी खराब झाली. भुईमूग, तूर, मूग, उडीद, शेंगा पूर्णपणे खराब झाल्या. सर्वाधिक फटका कापूस, मका, ज्वारी, बाजरी यांना बसला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ४८ सहाय्यक कृषी अधिकारी, १२५ ग्रामसेवक, ७५ तलाठी पंचनामे करीत आहेत. ते करताना शेतकऱ्यांकडून राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, आधारकार्ड, फार्मर आयडी, जीपीएस फोटो घेतले जात आहेत. तालुक्यात ९१ हजार हेक्टर जमिनीवर खरिपात लागवड झाली. तर २७ हजार हेक्टरवर डाळिंब, लिंबू, सीताफळची लागवड झाली आहे. पंचनामे करताना कपाशी मका, कांदा, बाजरी, ज्वारी, सोयाबीन यासह फळपिकांचे पंचनामे केले जात आहेत.
----
५० हजार हेक्टरचे पंचनामे
मालेगाव तालुक्यात १५१ गावे आहेत. एक लाख १८ हजार ९१९ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ९८ हजार ९०० शेतकरी आहेत. तालुक्यात ३० सप्टेंबरपासून कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७५ गावांमध्ये ४९ हजार ७७९ हेक्टरवरील ५२ हजार २४८ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक आघाडीवर मालेगाव तालुका आहे. येथे आतापर्यंत ४१.८६ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
-----
------
तालुक्यातील लागवड व बाधित क्षेत्र असे
पिकाचे नाव- क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मका - ५८, ५७३
कपाशी- २१ हजार ३६६
बाजरी - ८ हजार ५८३
ज्वारी - २३८ हेक्टर
मूग - ८७३
तूर - ५३१
भुईमूग - ९२६
सोयाबीन - ३५०
------
कोट
आठ दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. तालुक्यातील एकही दुष्काळग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाहीत. कृषी, महसूल अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे केले जात आहेत.
- भगवान गोर्डे
तालुका कृषी अधिकारी, मालेगाव
-------