MSI26B09483
आळंदी : कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राष्ट्र गौरव पुरस्कार ऋतूराज ठाकरे यांना प्रदान करताना डॉ. युवराज ठाकरे, तृप्तीताई देसाई, डॉ. अलका नाईक, ॲड. रमेश राठोड, संजय कुलकर्णी.
-------------
ऋतूराज ठाकरे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
म्हसदी, ता. ३१ : भारत सरकारच्या निती आयोग प्रमाणित वरुड (जि. अमरावती) येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा राष्ट्र गौरव पुरस्कार प्रतापपूर (ता. साक्री) येथील माजी सरपंच तथा साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऋतूराज विजयकुमार ठाकरे यांना रविवारी (ता. ३०) आळंदी (पुणे) येथील द कल्चर हॉटेलमध्ये शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, स्नेहवस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
साक्री तालुक्यातील सोळागाव काटवान परीसरातील सामाजिक कार्यकर्ते ऋतूराज ठाकरे यांच्या सामाजिक, समाजोपयोगी कार्याची दखल घेत ‘राष्ट्र गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई, डॉ. अलका नाईक, ॲड. रमेश राठोड, अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऋतूराज ठाकरे यांच्यासह प्रतापपूर येथील एकवीस ग्रामस्थांनी पुरस्कार स्वीकारला.
भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री बिंदुशेठ शर्मा, प्रतापपूर येथील येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक गांगुर्डे, उपसरपंच दत्तात्रय गांगुर्डे, देविदास गांगुर्डे, गुलाब शिंदे, प्रशांत शिंदे, प्रशांत शिंदे, सुनील गांगुर्डे, विपुळ गांगुर्डे, जयेश देसले, दीपक गांगुर्डे, प्रकाश गांगुर्डे, सचिन ठाकरे, माजी उपसरपंच नितीन ठाकरे, संजय ठाकरे, दत्तात्रय गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, शरद ठाकरे, प्रा. नीरज गांगुर्डे, विनय राऊत उपस्थित होते. ऋतूराज ठाकरे प्रतापपूर येथील पोलिस पाटील विजयकुमार ठाकरे व सरपंच ललिता ठाकरे यांचे पुत्र आहेत.