MSI26B09488
साक्री : कावड यात्रेकरूंच्या स्वागतप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ.
-------------------
काशि विश्वनाथ ज्योतिर्लिंगकडे
भाविक कावड यात्रेने मार्गस्थ
म्हसदी, ता. ३ : श्रावण महिन्याचे औचित्य साधून काशि विश्वनाथ ज्योतिर्लिंगकडे साक्री तालुक्यातील छडवेल पखरुण पैकी विजापूर येथील भाविक पायी कावड यात्रेने रविवारी (ता. ३०) मार्गस्थ झाले. हातात सजवलेली कावड, भगवे ध्वज व मुखात ‘हर हर महादेव’ व ‘बम बम बोले’चा गजर करत कावड यात्रा मार्गस्थ झाली.
साक्री तालुक्यातील छडवेल पखरून पैकी विजापूर येथील नाना अंतू कुडाळ, येसा गोयकर, लाला गोयकर, धनाजी गोयकर, बालू सुळ, लहानु गोयकर, मावशीराम सूळ, गुलाबराव सुळ, खंडू गोयकर, राजू गोंदे, दामू गोयकर यांच्यासह शेकडो ठेलारी समाजबांधव शिवभक्त या यात्रेत सहभागी झाले आहेत. प्रस्थानापूर्वी साक्रीत जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, उत्पल नांद्रे, साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाचे उपसभापती प्रदीपकुमार नांद्रे, धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक, ऋषिकेश मराठे, भाजपचे साक्री मंडल सरचिटणीस मुन्ना देवरे यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते कावड पूजन करून यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
----------
वैद्यकीय सुविधांची व्यवस्था
शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास सुकर व्हावा यासाठी भक्तांसाठी ठिकठिकाणी विश्राम, अल्पोपहार आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपरिक ढोल- ताशांच्या गजरात, शिवभजनांच्या तालावर तरुण, ज्येष्ठ भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कठोर नियमांचे पालन करत, अनवाणी पायांनी हा प्रवास पूर्ण केला जाणार आहे. साक्री येथे पोहोचल्यानंतर भगवान शिवाचा जलाभिषेक करून या यात्रेची सांगता होईल.