विखरण माध्यमिक विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा

विखरण माध्यमिक विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा
Published on
MSI26B09490 विखरण : माध्यमिक विद्यालयात धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थीनी. ---------------- विखरण विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा म्हसदी, ता. ३ : येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री.आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरशालेय कबड्डी, खो- खो, कबड्डी, लंगडी, क्रिकेट, लगोरी, रस्सीखेच, धावण्याच्या शर्यती, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडाकौशल्याचा वापर करीत पारंपरिक खेळांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. मुख्याध्यापक डी. डी. साळुंखे, क्रीडा विभागप्रमुख व्ही. बी. अहिरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. व्ही. बी. अहिरे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व व मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची माहिती दिली. मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, खिलाडूवृत्ती विकसित होते. पारंपरिक मैदानी खेळ अभ्यासाबरोबरच खेळही तितकाच महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. पंच म्हणून एस. एच. गायकवाड, एम. एस. मराठे, एम. डी. नेरकर, वाय. डी. बागूल यांनी कामकाज पाहिले. डॉ. आर. आर. बागूल यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. बेडसे यांनी आभार मानले. एस. जी. पाटील, एच. एम. खैरनार आदींनी परिश्रम घेतले.
Marathi News Esakal
www.esakal.com