MSI26B09505
म्हसदी : सी. डी. देवरे माध्यमिक व गंगामाता कन्या विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करताना शिक्षक.
------------------
देवरे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
--
विद्यार्थ्यांनी सांभाळली अध्यापनाची धुरा; विद्यार्थ्यांचा गौरव
म्हसदी, ता. ५ : येथील सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि गंगामाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ५) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य नरेंद्र देवरे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे उपस्थित होत्या.
-
या वेळी सी. डी. देवरे विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापनाचे कार्य केले. यात कावेरी बेडसे हिने प्राचार्य पदाची आणि वेदांत देवरे याने मुख्याध्यापकाची धुरा सांभाळली. नेहा नेरकर, स्वामी बेडसे, हर्षाली विसपुते व मृणाल देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी दोन्ही विद्यालयांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. उत्कृष्ट अध्यापन करणारे विद्यार्थी विशाखा देवरे, हर्षदा देवरे, स्वामी बेडसे, मृणाल देवरे, कावेरी बेडसे व खुशी पिंजारी यांना शैक्षणिक साहित्य व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. समारंभादरम्यान एस. पी. पाटील व जी. एल. कांगणे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका देवरे यांनी विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून कठोर परिश्रमातून जीवनात उच्च स्थान प्राप्त करावे, असे आवाहन केले. नरेंद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन शाळा व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. एन. जी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.