MSI26B09528
शिर्डी (अहिल्यानगर) : बी दि बेज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार डॉ. अर्जुन तोरवणे यांना प्रदान करताना भारत सुंदरी अभिनेत्री निवेदिता पगार, मेजर सुनील मोहाड.
------------
डॉ. अर्जुन तोरवणे यांना
राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार
म्हसदी, ता. १० : शिर्डी येथील बी दि बेज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार बेहेड (ता. साक्री) येथील फळबागायतदार शेतकरी, गावखेती योजनेचे प्रणेते डॉ. अभियंता अर्जुन मोतीराम तोरवणे यांना शिर्डीत नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, स्नेहवस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कृषी, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. तोरवणे यांचा राज्यस्तरीय बहुमान करण्यात आला. भारत सुंदरी अभिनेत्री निवेदिता पगार, मेजर सुनील मोहोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. डॉ. तोरवणे यांनी गेल्या दहा वर्षांच्या परिश्रमांतून ‘गावखेती’ हे डिजिटल मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पिकांचे नियोजन,बाजारातील मालाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाशी संबंधित सुमारे तीस प्रमुख आव्हानांवर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढते. पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट विलेज’ आणि ‘आत्मनिर्भर शेतकरी’ या संकल्पनेला तळागाळात प्रत्यक्ष उतरवणारे हे गाव- केंद्रित देशात ‘दुसरी हरितक्रांती’ घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उत्प्रेरक ठरू शकते, असा विश्वास कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.