विखरण माध्यमिक विद्यालयात पालक मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा

विखरण माध्यमिक विद्यालयात पालक मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा
Published on
विखरण विद्यालयात पालकांचा मेळावा म्हसदी : विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीअंतर्गत शिक्षक- पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. अरुण वसंत पाटील अध्यक्षस्थानी होते. उपशिक्षक एम. डी. नेरकर यांनी प्रास्ताविक केले. शाळा व्यवस्थापन समितीअंतर्गत सखी सावित्री विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, महिला तक्रार समितीतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील, योगेश पाटील, योगेश मराठे, सुनील मराठे, योगेश कोळी उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी विद्यार्थ्यांचा आहार, झोप, अभ्यास, शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध खेळ, शासन स्तरावर व शाळा स्तरावर विविध परीक्षांची माहिती करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. उपशिक्षक वाय. डी. बागूल, स्पर्धा परीक्षांविषयी, विद्यार्थिनी सुरक्षाविषयक विषयांवर एस. एच. गायकवाड यांनी चर्चा केली. एम. एस. मराठे यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. बेडसे यांनी आभार मानले. डॉ. आर. आर. बागूल, व्ही. बी. अहिरे, जे. एस. पाटील, डी. बी. पाटील, एस. जी. पाटील, एच. एम. खैरनार यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com