MSI26B09538
अक्कलपाडा : गौरव गांगुर्डे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करताना निसर्ग मित्र समितीचे पदाधिकारी.
-----------------
निसर्ग मित्र समितीतर्फे
अक्कलपाड्यात वृक्षारोपण
म्हसदी, ता. १४ : अक्कलपाडा (ता. साक्री) येथील गौरव मधुकरराव गांगुर्डे माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारप्राप्त निसर्ग मित्र समितीतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र मधुकरराव गांगुर्डे अध्यक्षस्थानी होते. निसर्ग मित्र समितीचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे, राज्य महासचिव संतोषराव पाटील, विलास देसले, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे, संजय बच्छाव, दीपक नांद्रे, सुभान पिंजारी, प्रा. डॉ. मनीषा पाटील, वैभव पाटील, निवृत्त प्राचार्य पी. एस. सोनवणे, सीमाताई सोनवणे, मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. मधुकरराव गांगुर्डे, संजीवनी गांगुर्डे यांनी निसर्ग मित्र समितीच्या पदाधिकाऱ्यांचा रोपटे, पुस्तक भेट देऊन सत्कार केला. मधुकरराव गांगुर्डे व शिक्षक व्ही.एस.पवार यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले. एम. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एस. पवार यांनी आभार मानले. एस. डी. अहिरराव, एम. आर. शिसोदे, सी. एच. वाघ, के. पी. चौरे, ए. बी. पदमर, अशोक कर्वे व महात्मा गांधी छात्रालयाचे अधीक्षक महेंद्र सोनवणे उपस्थित होते.