देवरे महाविद्यालयात युवती सभेचे आयोजन

देवरे महाविद्यालयात युवती सभेचे आयोजन
Published on
विद्यार्थिनींनी संशोधन केंद्रांना भेटी द्याव्यात डॉ. शिवाजी पाटील : देवरे महाविद्यालयात युवती सभा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. १५ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी प्रशासकीय, सामाजिक, वैचारीक आणि संशोधन केंद्रास भेटी दिल्या पाहिजेत. त्यांचे प्रबोधन व्हावे. तरच त्या सक्षम, आत्मविश्वासी, निर्णयक्षम आणि जबाबदार नागरिक घडतील, असे मत प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व येथील (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सात ते बारा सप्टेंबरदरम्यान आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. आढावे, सिनेट सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. वनिता पवार, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. बी. भामरे उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. उमेश गवई यांनी सूत्रसंचालन केले. अभियानाअंतर्गत क्षेत्र भेटीसाठी विद्यार्थिनींना म्हसदी गावातील तन्वी मेक ओव्हर आणि ब्युटी पार्लर येथे नेण्यात आले. संचालिका मैथिली देवरे यांनी विद्यार्थिनींना स्वयंपूर्ण होण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच, येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी भेट देण्यात आली. तेथे बॅंकेचे व्यवस्थापक विद्यासागर सौंदळकर यांनी बॅंकेचे कामकाज कसे चालते, याविषयी मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्याठिकाणी डॉ. वाघ यांनी सरकारी दवाखान्यातील कामाचे स्वरूप विद्यार्थिनींना समजावून सांगितले. त्यानंतर साक्री येथील पोलिस ठाण्याला क्षेत्र भेट देण्यात आली. पोलिस निरीक्षक दीपक वळवी, श्री. शिरसाठ यांनी एस. एल. आर. रायफल व पोलिस गन याबद्दल माहिती दिली. साक्री पंचायत समितीच्या भेटीत गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. माळचे यांनी विविध विभागाचे कामकाज कसे चालते ते समजावून सांगितले. डॉ. प्रवीण महाले यांनी युवती अभियान कार्यशाळाअंतर्गत झालेल्या उपक्रमांचे कौतुक केले. उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. आढावे उपस्थित होते. डॉ. ऋषिकेश चित्तम व डॉ. सुनील बावणे उपस्थित होते. निशा सोनवणे हिने सूत्रसंचालन केले. रिमझिम देवरे हिने आभार मानले. डॉ. उमेश गवई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com