वसमार येथे बुधवारपासून श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह

वसमार येथे बुधवारपासून श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह
Published on
वसमार येथे आजपासून कीर्तन सप्ताहाचे आयोजन म्हसदी, ता. १५ : वसमार (ता. साक्री) गावात एकीतून श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताह साजरा केला जातो. यंदा स्वानंदसुखनिवासी जायखेडा येथील कृष्णा गुरुजी माऊली, जयराम बाबा गोंडगावकर यांच्या आशीर्वादाने आजपासून (ता. १६) ज्ञानेश्वर पारायण व कीर्तन सप्ताह सुरू होत आहे. सप्ताहात पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरीपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम होतील. १६ ते २३ सप्टेंबरपर्यंत दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. बुधवारी (ता. १६) सोपान महाराज ककाणीकर, गुरुवारी (ता. १७) दीनानाथ महाराज तळवाडेकर, शुक्रवारी (ता. १८) गंगाराम महाराज पैठण, शनिवारी (ता. १९), विलास महाराज गेजगे, रविवारी (ता. २०) जनार्दन महाराज आरावेकर, सोमवारी (ता. २१), सौरव महाराज कुंडाणे, मंगळवारी (ता. २२) माऊली महाराज जांभळे यांचे कीर्तन होईल. बुधवारी (ता. २३) महामंडलेश्वर अनंत महाराज कजवाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. यंदा आनंदा रघुनाथ नेरे यांनी महाप्रसादाचे यजमानपद स्विकारले आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com