(ॲंकर शेजारी)
------------
आर. डी. देवरे महाविद्यालयात
हिंदी दिनानिमित्त व्याख्यान
म्हसदी, ता. १५ : येथील आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेच्या (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. साक्री येथील सी. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी ‘राजभाषा का महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील अध्यक्षस्थानी होते.
हिंदी राष्ट्रभाषेचा इतिहास, हिंदी भाषेतील साहित्यिक त्यांचे साहित्य खूप महान आहे. संविधान मध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा १४ सप्टेंबर १९४९ ला प्राप्त झाला.म्हणून हिंदी दिवस साजरा करण्यात येत असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. हिंदी विभागप्रमुख डॉ. वनिता पवार यांनी प्रास्ताविक केले. सिनेटर डॉ. ऋषिकेश चित्तम, उपप्राचार्य प्रा. वाल्मिक आढावे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी हिंदी भाषेचा प्रचार- प्रसार झाला पाहिजे, या दृष्टीने महाविद्यालयात १४ सप्टेंबर हिंदी दिन साजरा करण्यात येतो. तसेच, हिंदी भाषेविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी म्हणून काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन येत असल्याचे सांगितले. प्रा. जगदीश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. हेमंत पाटील, प्रा. मिलिंद देवरे यांनी परिश्रम घेतले.