MSI26B09581
साक्री : सी. गो. पाटील महाविद्यालयात ओझोन दिनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित डॉ. अजय नांद्रे व प्राध्यापक.
----------------
ओझोन थराचे संरक्षण
न केल्यास समस्या
प्रा. डॉ. अजय नांद्रे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. २१ : मानवाच्या अतिरेकी, अविवेकी वर्तणुकीमुळे ओझोन थराला क्षती पोहोचत आहे. वेळीच ओझोन थराचे संरक्षण व संवर्धन केले नाही तर संपूर्ण मानव जातींना अनेकविध समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती निसर्ग मित्र बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष, साक्री येथील विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. अजय नांद्रे यांनी व्यक्त केली.
साक्रीत विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे ओझोन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. भूगोल विभागप्रमुख प्रा डॉ. एस. आर. गोवर्धने अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. कमलेश सूर्यवंशी, प्रा. भटू पाटील व प्रा. समवेल वसावे उपस्थित होते.
प्रा. डॉ. एस. आर. गोवर्धने यांनी ओझोनच्या संरक्षणामुळे ग्लोबल वार्मिंगला आळा, सजीव सृष्टीचे रक्षण, अन्नसाखळीचे संतुलन, सहकार्याची भावना विकसित होते व पर्यायाने सखल वसुंधरेचे संतुलन राखले जाऊन जागतिक विकास होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रा.कमलेश सूर्यवंशी यांनी ओझोन दिवसाचे महत्व विषद केले. प्रा. भटू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी चेतन मोहिते यांनी आभार मानले.