दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना सुरक्षितेचे धडे

दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना सुरक्षितेचे धडे
Published on
दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना सुरक्षितेचे धडे म्हसदी, ता. २२ : येथील वनश्री पुरस्कारप्राप्त गंगामाता कन्या विद्यालयात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये महिला सुरक्षा, कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली. मुख्याध्यापिका व्ही. एन. देवरे अध्यक्षस्थानी होत्या. दामिनी पथकाच्या प्रमुख मंजुळा कोकणी उपस्थित होत्या. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, पाठलाग, धमकी, अश्लील शेरेबाजी तसेच सोशल मीडिया व इतर ऑनलाइन माध्यमातून होणारा त्रास याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावधगिरी बाळगावी, वैयक्तिक माहिती, फोटो अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत, सोशल मीडिया वापरताना गोपनीयतेच्या बाबतीत दक्ष राहावे, असे आवाहन केले. तसेच, संकटाच्या प्रसंगी तातडीच्या पोलिस मदतीसाठी ११२ या आपत्कालीन क्रमांकाचा वापर करण्याची माहिती देण्यात आली. दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके, इतर गर्दीच्या ठिकाणी महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. महिलांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा त्रास सहन न करता त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मुख्याध्यापिका देवरे यांनी विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता, सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाल्याचे स्पष्ट केले. श्री. सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र देवरे यांनी मार्गदर्शन केले. आर. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. गावित यांनी आभार मानले. जी. एल. कांगणे, एम. डी. साळुंखे, एस. के. शिरसाठ, पोपट अहिरे, कमर पिंजारी, राहुल बागूल आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com