श्रीहरी गौरव पुरस्कारांचे
मांगीतुंगीला रविवारी वितरण
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. ३ : श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणगौरव सोहळा रविवारी (ता. ६) सकाळी अकराला श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मांगीतुंगी येथे होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद नेरकर व सचिव स्नेहलता नेरकर यांनी ही माहिती दिली.
प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांसह गुणवंतांचा गौरव केला जातो. यंदाच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ (कापडणे, धुळे) राहणार आहेत. आमदार दिलीप बोरसे, सी. आर. पाटील, भाऊसाहेब अहिरे, डॉ. नीलेश कुंभारे, कविता मेखे, मनोज ब्राह्मणकर, पी. बी. वाणी, शरद बाळकृष्ण पाटे उपस्थित राहणार आहेत.
श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मांगीतुंगीचे अध्यक्ष तथा निवृत्त अपर राज्यकर आयुक्त सुमेर काळे प्रमुख पाहुणे असतील. श्री मांगीतुंगी दिगंबर जैन देवस्थान अध्यक्ष व ट्रस्ट समितीस ‘आदर्श लक्ष्मी-नारायण जोडी’ विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दीपक पगार-हर्षदा पगार, साकरचंद कांकरिया-पुष्पा कांकरिया तसेच विनोद पाटणी-मीना पाटणी (उमराणे) या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी वासुदेव बधान व संदीप सोनजे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
चौकट
गुणवंतांचा गौरव
राजेंद्र निकम, अरविंद बागड, हेमंत बधान, ज्ञानेश्वर मोरे, उदय पगारे, रावसाहेब पगारे, अरुण भामरे, डॉ. भूपेंद्र मालपुरे, विनोद सावंत, प्रदीप गहिवरे, उदयकांत साकरेकर, एकनाथ सावळा, नंदकिशोर शिरोडे, दत्तात्रेय वाणी, दीपक भदाणे, योगेश महालपुरे, विनोद पाटील, सतीश कापडणीस, उमाकांत वाकलकर यांच्यासह मातोश्री रतनबाई कांकरिया प्राथमिक शाळा (मांगीतुंगी) यांचा गौरव करण्यात येणार आहे.