मक्याला २४२१ उच्चांकी भाव

मक्याला २४२१ उच्चांकी भाव
Published on
फोटो-09971 नामपूर : बाजार समितीत मका व्यापाऱ्यांचा सत्कार करताना बाजार समितीचे संचालक विलास सावंत. नामपूर बाजार समितीत मक्याला २४२१ भाव लिलावास प्रारंभ; सभापती, उपसभापतींची माहिती नामपूर, ता. १६ : येथील बाजार समितीच्या आवारात नवीन हंगामातील मका लिलावाचा प्रारंभ बुधवारी (ता. १६) करण्यात आला. मक्याला २ हजार ४२१ रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला. बाजार समितीच्या सभापती मनिषा पगार, उपसभापती किरण वाघ यांनी ही माहिती दिली. बागलाण तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी शेती सिंचनाच्या माध्यमातून मक्याचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. बाजार समितीच्या आवारात मका लिलावाच्या प्रारंभदिनी सुमारे १०० क्विंटल मक्याची आवक झाली. द्याने (ता. बागलाण) येथील प्रयोगशील शेतकरी संदीप कापडणीस यांच्या मक्याला सर्वोच्च भाव मिळाला. तनिष्का एक्सपोर्ट कंपनीचे रिंकल जैन यांनी सर्वोच्च भावाचा मका खरेदी केला. मक्याला सरासरी भाव २२०० रुपये, तर कमी भाव २१७५ रुपये इतका मिळाला. बाजार समितीचे संचालक, विलास सावंत यांनी मका व्यापाऱ्यांचा सत्कार केला. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमित सावंत, मका व्यापारी जितेंद्र बडजाते, महावीर ट्रेडिंग कंपनी आदींनी मका खरेदी केला. एमजी ट्रेडिंग, पूर्वा ट्रेडिंग, बजरंग ट्रेडिंग, भाग्यश्री ट्रेडिंग, साईराम ट्रेडिंग, स्वामी ट्रेडिंग, दिगंबरा ट्रेडिंग, गणराज ट्रेडिंग, एमटीएस ट्रेडिंग, के.के. ट्रेडिंग, सारिका ट्रेडिंग, आठवले ट्रेडिंग, शिवप्रसाद ट्रेनिंग, विघ्नहर्ता ट्रेडिंग, जय किसान ट्रेडिंग, एसटी ट्रेडिंग, गौरव ट्रेडिंग आदी व्यापारी उपस्थित होते. नामपूर बाजार समितीत मक्याला सर्वोच्च भाव मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनी मका विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड यांनी केले आहे. अरुण अहिरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com