फोटोसह बातमी घ्यावी.
------------------
देशातील शंभर प्रतिष्ठित
महिलांमध्ये अंजूम कांदे
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १४ : समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी तसेच समृध्दी बँकेच्या अध्यक्षा अंजूमताई कांदे यांना भारताच्या १०० प्रतिष्ठित महिला २०२६" या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीत एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सोशल मार्केटिंग'' ''इन्फर्मेशन कम्युनिकेशन'' च्या माध्यमातून काम करणाऱ्या पारिसा कम्युनिकेशन या संस्थेतर्फे अभिनेत्री रितू शिवपुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मदतीचा हात पुढे केल्यास त्यांच्या जीवणात आशादायी चित्र निर्माण करता येईल. असे स्पष्ट करीत कांदे यांनी यावेळी देवाज सोशल फाउंडेशनच्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या दोन हजाराहून अधिक रुग्णांचा सांभाळासह विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी देशाच्या विविध प्रातांतून वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण शंभर भगिनींचा गौरव करण्यात आला.
दिल्ली : अभिनेत्री रितू शिवपुरी यांच्या हस्ते देशातील शंभर प्रतिष्ठित महिला पुरस्कार स्वीकारताना समृद्धी बँकेच्या अध्यक्षा अंजूमताई सुहास कांदे, संचालिका तब्बूसुम हक