ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे वॉटर एटीएम चे लोकार्पण

ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे वॉटर एटीएम चे लोकार्पण
Published on
10696 नांदगाव : ग्रामीण रूग्णालयात पाण्याच्या एटीएमचे लोकार्पण करताना अंजुम कांदे, नगराध्यक्ष सागर हिरे, ॲड.विद्या कसबे आदी. नांदगावला ग्रामीण रुग्णालयात वॉटर एटीएमचे लोकार्पण नांदगाव : आमदार सुहास कांदे, समृद्धी बँकेच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याचे वाटर एटीएम बसविले. या वॉटर एटीएमचे लोकार्पण श्रीमती. कांदे व नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१५) झाले. ग्रामीण रुग्णालयास श्रीमती. कांदे यांनी भेट दिली असता रुग्णालयात वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या सोबतच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मोठी अडचण येत असे. ती दूर करण्यासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्यासाठी एटीएमची व्यवस्था कांदे यांनी उपलब्ध करून दिली. यावेळी महिला बाल कल्याण सभापती ॲड. विद्या कसबे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आरोग्य सेवक यांच्यासह नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com