पान तीन ॲंकर
-------------------
10698
नांदगाव : शनिदेव मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली शनी देवाची पुरातन वालुकामय मूर्ती.
नस्तनपूर शनिपीठावर २५ वर्षांनंतर ''त्रिवेणी संगम''
आज लाखो भाविक दर्शन घेण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १५ : आध्यात्मिक क्षेत्रात विशेष महत्त्व असलेले आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले देशातील प्रमुख शनिपीठ म्हणजेच नस्तनपूर. शनिवारी (ता.१५) या तीर्थक्षेत्री तब्बल २५ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा ''त्रिवेणी संगम'' सुवर्णयोग जुळून येत आहे.
या ऐतिहासिक पर्वणीसाठी नस्तनपूर (ता. नांदगाव) पंचक्रोशीसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. सोहळ्यासाठी मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त, माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची व्यवस्था युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे.
संस्थानच्या वतीने परिसरातील तरुणांना या पुण्य पर्वकाळात शिस्त राखण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐतिहासिक योगाचे साक्षीदार होण्यासाठी आणि शनिदेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन येथील संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. यांनी केले.
काय आहे हा ''त्रिवेणी संगम'' सुवर्णयोग?
यावर्षी तीन मोठे सोहळे एकाच दिवशी आल्याने याला आध्यात्मिक दृष्ट्या ''दुग्धशर्करा योग'' मानले जात आहे. प्रथम श्री शनी महाराज जन्मोत्सव: सूर्यपुत्र शनिदेवाचा प्रकट दिन मोठ्या थाटात साजरा होणार आहे. त्यानंतर अखंड चाललेल्या गाथा पारायणाची पूर्णाहुती होऊन महाप्रसाद वितरण केले जाईल. यासोबत नस्तनपूरची पारंपरिक यात्रा देखील याच दिवशी होत आहे.
रामराज्यकालीन आख्यायिका
नस्तनपूर स्थानाचे महत्त्व पुराणातही अधोरेखित करण्यात आले आहे. वनवासात असताना प्रभू श्री रामचंद्र यांनी याच ठिकाणी शनिदेवाची विशेष आराधना केली होती, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या क्षेत्राला आध्यात्मिक ऊर्जा केंद्र'' मानले जाते.