होमगार्ड जवानांना पोलीस भरतीत वयोमर्यादेत सवलत द्या; आमदार सुहास कांदेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

होमगार्ड जवानांना पोलीस भरतीत वयोमर्यादेत सवलत द्या; आमदार सुहास कांदेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Published on
​10700 नांदगाव : आमदार सुहास कांदे यांना निवेदन देताना ॲड. उमेशकुमार सरोदे व सहकारी. पोलीस भरतीसाठी होमगार्ड जवानांची वयोमर्यादा ३८ वर्षे करा आमदार सुहास कांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नांदगाव, ता. १५ : राज्यातील पोलिस दलाला आपत्कालीन आणि नैसर्गिक संकटांच्या काळात मोलाची साथ देणाऱ्या होमगार्ड (गृहरक्षक दल) जवानांना पोलीस शिपाई भरतीमध्ये वयोमर्यादेत सवलत मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. होमगार्डसाठी ही वयोमर्यादा ३८ वर्षांपर्यंत वाढवावी, या आशयाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पोलिस भरतीमध्ये होमगार्ड आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जवानांना किमान ३ वर्षे सेवा पूर्ण करणे अनिवार्य असते. मात्र, ही अट पूर्ण करेपर्यंत अनेक जवानांची वयोमर्यादा संपलेली असते. त्यामुळे पात्र असूनही केवळ वयाअभावी त्यांना पोलिस भरतीचे अर्ज भरता येत नाहीत. या समस्येची दखल घेत आमदार कांदे यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आमदार कांदे यांनी निवेदनात नमूद केले की, पोलीस भरतीमध्ये इतर घटकांना वयोमर्यादेत मोठी सवलत दिली जाते. याच धर्तीवर, प्राणाची बाजी लावून सेवा देणाऱ्या होमगार्ड घटकालाही न्याय मिळावा आणि त्यांच्यासाठी वयोमर्यादेची अट ३८ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येथील होमगार्ड संघटनेचे समादेशक अधिकारी ॲड. उमेशकुमार सरोदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील होमगार्ड जवानांनी आमदार सुहास कांदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी गौरव कोठावदे, वसंत मोरे, ज्ञानेश्वर जगधने, ज्ञानेश्वर खाडे, हर्षल बोरसे, गणेश दराडे, किरण भाबड आदी होमगार्ड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com