फोटो ः 10786
नांदगाव ः छत्रपती संभाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना शालेय पदाधिकारी.
---
शाहू महाराजांचे विचार
समाजाला दिशा देणारे ः काळे
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक आणि बहुजन उद्धाराचे ऐतिहासिक कार्य अजोड आहे. त्यांचे विचार आजही समाजाला प्रगतीची नवी दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केले.
विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका काळे व पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. श्रीमती काळे यांनी शाहू महाराजांच्या क्रांतीकारी निर्णयांची सविस्तर माहिती दिली. पर्यवेक्षक शेवाळे यांनी छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाश टाकला. संभाजी महाराजांचे असीम शौर्य, युद्धकौशल्य आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---