चार दिवसांच्या काळजाचा ठोका थांबविणाऱ्या प्रतीक्षेला अखेर विराम

चार दिवसांच्या काळजाचा ठोका थांबविणाऱ्या प्रतीक्षेला अखेर विराम
Published on
पान-३ मुख्य अंक ------------- बेपत्ता चिमुकली चार दिवसांनी सापडली वाईबोथीत --------- बेवारस स्थितीत होती झोपडीजवळ, बाभूळवाडीहून तेथे गेली कशी याचा तपास सुरू -------------- सकाळ वृत्तसेवा नांदगाव- बाणगाव बुद्रुक, ता.२० : आई- वडिलांच्या शेजारी गाढ झोपलेली आठ महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अचानक गायब होते... घराभोवती, गावात, शेतशिवारात आणि रस्त्यांवर शोधाशोध करूनही तिचा ठावठिकाणा लागत नाही... चार दिवस प्रत्येक क्षण काळजीत आणि अस्वस्थतेत काढल्यानंतर रविवारी (ता.२०) सकाळी वाईबोथी (ता. येवला) येथे रस्त्याच्या कडेला एका मजुराला बेवारस अवस्थेत ती आढळली अन सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.. तरीही ‘ती तिथे पोहोचली कशी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांसमोर त्याची उकल करण्याचे आव्हान आहे. --------------- बाभुळवाडी येथून गुरुवारी (ता.१७) मध्यरात्री बालिका बेपत्ता झाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली होती. स्थानिक गुन्हे शाखेची पथके, वरिष्ठ अधिकारी, श्वान पथक तसेच नातेवाईक आणि संशयितांची चौकशी करण्यात आली. आई-वडिलांपासून दूर गेलेली चिमुकली या काळात कुठे होती? तिची काळजी कोणी घेतली? बाभुळवाडीपासून वाईबोथीपर्यंत ती कशी पोहोचली? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येणे महत्त्वाचे आहे. तपासादरम्यान एका संशयिताची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील तपासाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेचा बालिका बेपत्ता प्रकरणाशी नेमका काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पोलिस तपासातील तथ्य समोर येणे आवश्यक आहे. रविवारी पहाटे अंदरसूलकडून वाईबोथीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील राऊते वस्ती परिसरात मजुरांच्या खोपीबाहेर बालिका एका मजुराला दिसली. त्याने ही माहिती पोलिस पाटील दत्तू आहेर यांना दिली. त्यांनी येवला पोलिसांना कळविले. नांदगाव पोलिसांच्या उपस्थितीत पालकांनी बालिकेची ओळख पटविली. पुढील तपासणीसाठी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ----------- अंनिसचे पोलिसना निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात अंधश्रद्धायुक्त बाबींचा वापर झाला आहे का, याचीही तपासाच्या दृष्टीने पडताळणी करण्याची मागणी नांदगाव पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक किंवा दिशाभूल झाली असल्यास संबंधितांची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. ---------------- फोटो २ कॉलम --चौकट कऱणे NAN26B11081 नांदगाव ः आत्महत्या केलेल्या श्रावण मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करताना आमदार सुहास कांदे. अंजुम कांदे व पीडित मोरे कुटुंबीय. १६-१ कुटुंबीयांच्या दुःखात माणुसकीची साथ या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दुःखात आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी माणुसकीच्या नात्याने आधार दिला. त्यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी कुटुंबीयांना किराणा, धान्य तसेच आर्थिक मदत देण्यात आली. संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com