रोटरी स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम

रोटरी स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम
Published on
NGL26B04034 दोंडाईचा : येथील रोटरी स्कूलमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी. ------------ दोंडाईचा रोटरी स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. ४ : दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आनंद, भक्ती, प्रेम व करुणा यांचे मिश्रण असणारा कृष्ण जन्माष्टमी उत्सव कृष्णलिला व दहीहंडीच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्राचार्य श्रुतिरंजन बारिक, समन्वयक प्रशांत जाधव यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन झाले. या वेळी नक्ष जोशीने बाळकृष्णाची, सोहम पाटीलने श्रीकृष्णाची, पार्थ चित्तेने सुदामाची, तर यथार्थ बागूल व यशवर्धन गिरासे यांनी द्वारपालची भूमिका प्रभावीपणे साकारून श्रीकृष्णाच्या बाललिला, भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रासलिलेचे नृत्यातून व मैत्रीच्या पवित्रतेची साक्ष देणारी द्वारकेच्या सुवर्णमहालातील कृष्ण- सुदामाच्या ऐतिहासिक आणि भावनिक भेटीचे नाट्यातून सादरीकरण केले. याप्रसंगी ''गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला, मच गया शोर सारी नगरी में’ या गीतांवर सर्वच विद्यार्थ्यांची पावले थिरकली. दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या स्कूलच्या गोविंदा पथकाने मनोरा तयार करून आनंदात चैतन्याची दहीहंडी फोडली. विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधा यांची वेशभूषा धारण केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल ढोले, स्वाती बडगुजर, मोनिश्री शर्मा, दीपमाला ठाकूर, ललिता वाघ, अजय हजारे, दिनेश सोनीस, सुजय पवार, जोशना गिरासे, धनंजय शिंदे, प्रियंका थोरात, बबिता जाधव, हर्षाली राजपूत यांचे सहकार्य लाभले.
Marathi News Esakal
www.esakal.com