दोंडाईचात २० सप्टेंबरला
पृथ्वी सन्मान सोहळा
निमगूळ, ता. १२ : दोंडाईचा येथील पृथ्वी मोलाची फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, ग्रामविकास आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘पृथ्वी सन्मान २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे २० सप्टेंबरला सायंकाळी चारला हस्ती प्री प्रायमरी स्कूल काराणी भवन येथे होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री चैत्राम पवार होते. प्रमुख वक्ते केदारनाथजी कवडीवाले मार्गदर्शन करणार आहेत. यावर्षीचा ‘बिल्व पत्र पुरस्कार’ जलसंधारण, पर्यावरण संवर्धन व ग्रामविकासाच्या क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या ग्रामविकास समिती, अक्कलकोस (ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांना प्रदान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील एव्हरेस्ट वीर चंद्रकलाजी गावित (मोहगाव, जि. धुळे), शाश्वत विषमुक्त शेती कृष्णाजी कडुबा झलवार (सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), वन्यजीव संरक्षण व वन जागृती गोल्डन अर्थ बायोडायव्हर्सिटी (धुळे गो-संवर्धन व प्रबोधन, विश्वमाता गोशाळा (सुराय, ता. शिंदखेडा), सर्प संवर्धन व संरक्षण- दीपक संजय धनगर (दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पृथ्वी मोलाची फाउंडेशनचे संचालक निहारिका बेलवलकर व पराग पंचभाई यांनी केले आहे.