विभागीय स्पर्धेत निवड

विभागीय स्पर्धेत निवड
Published on
NGL26B04064 धुळे : येथील वूशू स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांसह मान्यवर. ------------ रोटरी स्कूलच्या खेळाडूंची विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड निमगूळ, ता. २० : महाराष्ट्र राज्य युवक क्रीडा संचालनालय, पुणेअंतर्गत धुळे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुलात राज्य क्रीडा मार्गदर्शक श्‍वेता गवळी, धुळे जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव राहुल बर्वे यांची प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय वुशू स्पर्धा झाली. त्यात दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करून सहा सुवर्णपदके व चार रौप्यपदके प्राप्त केली. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या संघातील दृष्टी पाटील, पालवी पाटील, दिया पवार, मनस्वी बडगुजर, उज्वल मिस्तरी, कृष्णा पदमोर यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सुवर्णपदके व आरोही पदमोर, श्रेया चौधरी, गौरव मगरे, दुर्गेश धनगर यांनी रौप्यपदके प्राप्त केली. या सर्वांची विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक अजय हजारे, सुजय पवार व दिनेश सोनीस यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, संचालक मंडळ, प्राचार्य श्रुतिरंजन बारिक यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com