निफाड--चेहेडी दरम्यानचा शीवरस्ता खुला

निफाड--चेहेडी दरम्यानचा शीवरस्ता खुला
Published on
NPH26B08333 चितेगाव ः चेहेडीदरम्यानचा शीवरस्ता खुला झाल्यानंतर उपस्थित अधिकारी व शेतकरी. -------------- ३०-२ ३०-२ चितेगाव-चेहेडी शिवरस्ता ५० वर्षांनंतर झाला खुला वाहतुकीचा मार्ग खुला; कारवाईचे स्वागत सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.१४ ः निफाड तालुक्यातील चितेगाव- चेहेडी दरम्यानचा शीवरस्ता तब्बल ५० वर्षांपासून बंद होता. अखेर त्यावरील अतिक्रमण हटवून तो शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शुक्रवारी (ता.१५) महसूल प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, उपाधीक्षक, भूमी अभिलेख राजेंद्र भाबड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. मंडळ अधिकारी जयंत लिलके यांनी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वबैठक घेऊन रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर शशिकांत बैरागी (भूमी अभिलेख, निफाड) यांनी रस्त्याच्या हद्दी व खुणा निश्चित केल्या. यानंतर सुमारे एक किलोमीटर लांबीचा व नऊ मीटर रुंदीचा चितेगाव- चेहेडी शिवरस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला. अनेक दशकांपासून बंद असलेला हा रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतूक, शेतीकामासाठीची ये- जा आणि ग्रामसंपर्क अधिक सुलभ होणार आहे. या मोहिमेत ग्राममहसूल अधिकारी शेखर पाटील, अबोली साळवे, कैलास अहिरे, पूर्वा राठोड, पोलिस हवालदार जाधव, संबंधित ग्रामपंचायत अधिकारी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ रूमणे यांनी सहकार्य केले. चितेगाव आणि चेहेडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------- कोट गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चितेगाव- चेहेडी शिव रस्ता प्रशासनाने समन्वयातून खुला केला. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार असून ग्रामीण भागातील विकासाला गती मिळेल. प्रशासनाने लोकहिताचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन. - दिलीप बनकर, आमदार, निफाड -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com