फोटो-08449
निफाड ः सैन्य व पोलिस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी बाळासाहेब क्षीरसागर, प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, प्राध्यापक, पालक व यशस्वी विद्यार्थी.
निफाड महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड
निफाड ः येथील कर्मवीर गणपतदादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सैन्य आणि पोलिस दलात निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार झाला. प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, डॉ. डी. टी. ढगे, प्रा. ए. एस. वडघुले आणि प्रा. एस. बी. गायकवाड उपस्थित होते. सैन्य दलात आदित्य मत्सागर, शुभम शिंदे, अमोल नागरे, विवेक शिंदे, कृष्णा शेलार, सूरज पगार, रोहन वाघचौरे, कृष्णा वाघ, ओम बोरगुडे, यश खापरे, जागृती बोरगुडे, अक्षय लोखंडे, राहुल गिते, लक्ष्मण पवार, सिद्धेश ढेपले, कृष्णा थोरात आणि शुभम कराड यांची, तर पोलिस दलात वैष्णवी खैरे, प्रियंका गवे, निकिता फडे, श्याम कुटे, अजिंक्य अहिरे, शुभम काळे, विशाल सानप, सोमनाथ निकम, आदिती सोनवणे, मोनाली शेरे, मुस्कान शेख आणि धनश्री क्षीरसागर यांची निवड झाली. विद्यार्थ्यांना प्रा. एस. बी. गायकवाड, प्रा. सी. ए. मोरे आणि प्रा. सी. ए. कुंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य एस. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. एम. एल. कोटकर यांनी सूत्रसंचालन केले. डी. टी. ढगे यांनी आभार मानले.
....................