गांधर्व संगीत परीक्षेत यश

गांधर्व संगीत परीक्षेत यश
Published on
कुलस्वामिनी संगीत विद्यालयाचे गांधर्व संगीत परीक्षेत यश निफाड, ता. २५ : कुलस्वामिनी व्यक्तिविकास बहुउद्देशीय संस्था संचालित कुलस्वामिनी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या सन २०२५ च्या संगीत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. परीक्षेत प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम व विशारद पूर्ण या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अद्वेत चौधरी, शौर्या कराड, भक्ती आहेर, निर्मल हिरे, आदेश वाघ, पार्थ तासकर, शिव तासकर, सार्थक सांबरे, देवेश राणे, अजिंक्य भोसले, शिवनाथ शिरसाट, आराध्या धारराव, प्रतीक चव्हाण, भूषण चोरडीया, दर्श जोगी, पार्थ चौधरी, आदित्य भोसले, श्रेयस निकम, स्वराज काळे, रेयांश कोल्हे, रुचिता कानडे, समीर बर्डे, योगेश बर्डे, आराध्य दाते, दुर्वांक रायते, गौरव आहेर, ईश्वरी जेऊघाले, प्रणिती कुंभार्डे, ओजस बोराडे, अर्जुन तांबे, मोक्ष ठक्कर, अद्वैत ढेमसे, अक्षदा पुंड, अजिंक्य खेलुकर, जानवी कानडे, दर्शन तासकर, आरुष पाटील, शामली सानप, जानवी पाटील, सक्षम गोसावी, नयन कांदळकर, अन्वित जाधव, अथर्व वैष्णव, आर्यन बोरसे, यशराज आहेर, भूमि तातेड, कस्तुरी काळे, अथर्व नेरीकर, विजया पगार, कृष्णप्रिया कापसे व कौस्तुभ काळे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रमुख सुहास सुरळीकर व अभिजीत सुरळीकर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com