सिद्धी जाधवचे
एमपीएससीमध्ये यश
निफाड : धारणगाव खडक येथील सिद्धी शिवनाथ जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. सिद्धीने प्राथमिक शिक्षण निफाडच्या सरस्वती विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण नाशिकच्या रचना विद्यालयात पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षण तिने केटीएचएम कॉलेज, के.के. वाघ कृषी महाविद्यालय आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून (एम.टेक) पूर्ण केले. शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेत तिने हे यश खेचून आणले असून, याचे श्रेय तिने आई-वडील व गुरुजनांना दिले आहे.
---