NPH26B08666
निफाड ः नवनियुक्त पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांचा सत्कार करताना पोलिस पाटील.
----------
३६-३
डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा
----------
निफाड पोलिसांचे आवाहन ः एक गाव, एक गणपती’ला प्राधान्य देण्याचे आवाहन
--------
निफाड, ता. ५ ः यंदाचा गणेशोत्सव डिजेमुक्त साजरा करावा, प्रत्येक गावांनी एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्यावे असे आवाहन निफाड पोलिसांनी येथे झालेल्या पोलिस पाटलांच्या बैठकीत करण्यात आले.
---------------
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटलांची विशेष बैठक येथे झाली. बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
बैठकीस निफाडच्या नवनियुक्त पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव तसेच नुकतीच चांदवड येथे बदली झालेले पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस पाटलांनी गावपातळीवर नागरिक, गणेश मंडळे तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील विविध मंडळे व नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोखा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना करण्यात आली. शक्यतो डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. गणेशोत्सव काळात गावातील संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग, गर्दीची ठिकाणे आदींबाबत पोलिस प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊन सहकार्य करावे असेही पोलिसांनी स्पष्ट केले. नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचा सत्कार
नवनियुक्त पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांचा पोलिस पाटलांतर्फे सत्कार करण्यात आला. चांदवड येथे बदली झालेले अभिजित सोनवणे यांचाही सत्कार करून निरोप देण्यात आला. लक्ष्मण आहेर, संजय तळेकर, रवींद्र शिंदे, भाग्यश्री बोरसे, रोहिणी शिंदे, सविता कुंदे, सोपान साताळे, अभिजित पडोळ, विश्वास शिंदे, सदाशिव सानप, गोरक्षनाथ डांगले, मधुकर कोकाटे, आशा निकम, प्रशांत पुंड, अरुण गोसावी, भारत वहीकर, केदाबाई अहिरे, संतोष अस्वले हे पोलिस पाटील उपस्थित होते.
----------------