निफाड भीमराज काळे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

निफाड  भीमराज काळे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
Published on
बातमी आणि फोटो दोन्ही तीन कॉलम वापऱणे ----------- NPH26B08668 निफाड ः ज्येष्ठ क्रीडाशिक्षक भीमराज काळे यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना पंढरीनाथ थोरे, खासदार भास्कर भगरे, आमदार गोकूळ गिते, किशोर दराडे आदींसह सत्कार समितीचे सदस्य. ---------------- ३६-३ क्रीडाक्षेत्रात भीमराज काळे यांचे योगदान मोठे पंढरीनाथ थोरे ः देश पातळीवरचे खेळाडू घडवले, निवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.५ ः तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत भीमराज काळे यांनी देश आणि राज्य पातळीवरचे अनेक खेळाडू घडविले. तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात त्यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केले. श्रीरामनगर येथील रहिवासी तथा काकासाहेबनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक भीमराज काळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने सत्काराप्रसंगी ते बोलत होते. श्री. काळे हे २९ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले, त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंढरीनाथ थोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भास्कर भगरे, आमदार गोकूळ गिते, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, शकुंतलाताई वाघ, बाळासाहेब क्षीरसागर, शिरीष गडाख, रवींद्र मोरे, सोनिया होळकर शिवा पाटील गडाख, माणिकराव बोरस्ते, गणेश डोमाडे, राजेंद्र बोरगुडे, छबूराव जाधव, बबनराव सानप, महेश पठाडे, संपतराव डुंबरे, दिनेश धात्रक, तानाजी आंधळे, नानासाहेब दाते, शंकरराव कोल्हे, रामदास वाढवणे, गोविंद कुशारे आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवर तसेच विविध सामाजिक संस्थांतर्फे भीमराज काळे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना काळे म्हणाले,‘ मी माझ्या जीवनामध्ये कधीच नकारार्थी विचारांचा पुरस्कार केला नाही. नेहमीच दुसऱ्याला मदत करणे हा माझा स्थायीभाव राहिला. म्हणूनच मी माझे गाव, माझ्या कुटुंबातील, शाळेतील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व स्नेही जणांना सोबत घेऊन प्रवास केला. यापुढेही तो असाच राहील. किरण संधान यांनी प्रास्ताविक केले. सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com