निफाड म्हसोबा महाराज मंदिर

निफाड म्हसोबा महाराज मंदिर
Published on
NPH26B08681 निफाड ः येथील म्हसोबा महाराज मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेप्रसंगी सेवकलाल महाराज, जनेश्वर महाराज, गणेशगिरी महाराज यांच्यासह नागरिक. ------------------ निफाडला म्हसोबा महाराज मंदिराचा जीर्णोद्धार ----------- दोन शतकांचा वारसा ः विविध आश्रमांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा निफाड, ता.१० ः शहर व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुमारे दोनशे वर्षे जुन्या म्हसोबा महाराज मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. माजी नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका रूपाली रंधवे व युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांच्या स्वनिधीतून व पुढाकारातून मंदिराचा जीर्णोद्धार, विकास व सुशोभीकरण करण्यात आले. --------------- प्राणप्रतिष्ठेनिमित्त सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शुक्रवारी (ता.४) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी यज्ञ सोहळा व महापूजा पार पडली. सायंकाळी प्रसिद्ध आर्केस्ट्रा ‘स्वरस्पंदन’ प्रस्तुत रोशन बागल व सहकाऱ्यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. रविवारी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत भाविक व नागरिकांसाठी महाप्रसाद झाला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पूजा-अर्चा, मंत्रोच्चार व विविध धार्मिक विधी पार पडले. ‘म्हसोबा महाराज की जय’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराचा धार्मिक व ऐतिहासिक वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मंदिर विकासाचे काम करण्यात आले. या योगदानाबद्दल रूपाली रंधवे व विक्रम रंधवे यांचे नागरिक व भाविकांनी कौतुक केले. सोहळ्यास म्हाळसाकोरे येथील महंतयोगी सेवकलाल महाराज, भारतमाता आश्रमाचे महामंडलेश्वर जनेश्वर महाराज, जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे गणेशगिरी महाराज, गुरुमाऊली योगेश महाराज, गुरुवर्य नानासाहेब वावधाने यांच्यासह खासदार भास्कर भगरे, माजी आमदार अनिल पाटील कदम, वैशाली कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख खंडू पाटील बोडके, माजी नगराध्यक्षा कांताबाई कर्डिले, नगराध्यक्षा अरुंधती पवार, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, मुख्याधिकारी धीरज भामरे, अभियंता मयूरी नवले, गौरव मोरे, विद्यमान नगरसेवक, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com