निफाड कुत्रे सोडल्याप्रकऱणी गुन्हा दाखल

निफाड कुत्रे सोडल्याप्रकऱणी गुन्हा दाखल
Published on
NPH26B08707 निफाड ः लाक्षणिक कामबंद आंदोलन करताना येथील नगरपरिषदेचे कर्मचारी. --------------- निफाडला कर्मचाऱ्यांचे कामबंद, गुन्हे दाखल --------- मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर कुत्र्याची पिल्ले ः संबंधितांना अटकेची मागणी ---------- निफाड, ता.१७ ः नगरपंचायत कार्यालयात नगरसेविकेचे पती व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदा प्रवेश करून गोणीत आणलेली कुत्र्याची पिल्ले मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता.१७) लाक्षणिक काम बंद आंदोलन केले. दरम्यान याप्रकरणी चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ------------------ कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनादरम्यान पाणीपुरवठा व अग्निशामक सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. इतर प्रशासकीय व नागरिकांशी संबंधित कामकाज बंद ठेवण्यात आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार बुधवारी (ता.१६) नगरसेविका रुपाली विक्रम रंधवे यांचे पती विक्रम रंधवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयात प्रवेश करून गोणीत आणलेली कुत्र्याची पिल्ले मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडली. यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सर्व संबंधितांना अटक न झाल्यास आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. कार्यालय व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायत परिसरात आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणीही कऱण्यात आली. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच नगरपालिका शाखेच्या सहआयुक्तांकडे देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या फिर्यादीवरून नगरसेविका रुपाली रंधवे यांचे पती तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, बिरजू पठाण, सुनील पाठक व रतन गाजरे यांच्यासह संबंधितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, दमदाटी करणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच प्राण्यांचा क्रूरतेने छळ केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ------------- प्राणीमित्रांकडूनही कारवाईची मागणी प्राणीमित्र विजय रंगारे यांच्यासह मोमीन फकी, किरण कुंदे, प्रथमेश चौधरी, हिना पाटील, सुशांत शेलार, प्रदीप कुंदे, श्रीराम कुंदे, महेश निफाडे व आरती आहेर यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारनंतर पोलिस ठाण्यात भेट देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली. माजी आमदार अनिल कदम यांनी शिष्टमंडळासह निफाड पोलिसस ठाण्यात भेट देऊन हा वाद समोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हा दाखल झालेला असल्याने त्याचा कायद्यानुसार योग्य दिशेने तपास करण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते. ------------------------------- कोट घटनेचा योग्य तो तपास केला जाईल. तपासासाठी गुन्ह्यातील सर्वांना सूचना व नोटीस देण्यात आली आहे. पोलिस गरजेनुसार संबंधितांना चौकशीस बोलवतील. - सारिका अहिरराव, पोलिस निरीक्षक, निफाड ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com