दुःख निवारण करण्याचे एकमेव साधन म्हणजे प्रसन्न चित्त..

दुःख निवारण करण्याचे एकमेव साधन म्हणजे प्रसन्न चित्त..
Published on
NRS26B02287 नगरसूल (ता. येवला) ः येथे कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांचा सत्कार करताना नगरसूल ग्रामस्थ. --------------- ३६-२ दुःख निवारण करण्याचे साधन म्हणजे प्रसन्नचित्त ------------ रामराव महाराज ढोककः नगरसूल ग्रामस्थांतर्फे सत्कार ----------- सकाळ वृत्तसेवा नगरसूल, ता.१५ ः जीवनात संपत्ती माणसाला सुख देत नाही. कधी कधी कोट्यधीश माणसेही आत्महत्या करतात. ज्याचे मन विषन्न आहे, तिथे सुखाची हानी आहे. ज्याचे मन प्रसन्न आहे, तिथे दुःखाची हानी होते म्हणून प्रसन्न चित्त हे दुःख निवारण करण्याचे एकमेव साधन आहे असे प्रतिपादन कीर्तनकार, प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले आहे. येथे मारुती मंदिर, शनिमहाराज मंदिर व सावता महाराज मंदिर जिर्णोद्धार वर्धापनदिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगताप्रसंगी काल्याच्या कीर्तनावेळी ते बोलत होते. यंदा या सप्ताहाचे चौथे वर्षे होते. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ढोक महाराजांनी सध्याच्या काळात काही कीर्तनकारांच्या प्रचलित कीर्तन पद्धतीवर ताशेरे ओढताना संप्रदायाचा दाखला दिला. ते म्हणाले,‘ भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या! प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या!!" जेणे करुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची! ऐसी किर्तन मर्यादा आहे संताच्या घरीची!!" परमार्थात विषय काय, यापेक्षा वक्ता कोण याला फार महत्त्व आहे. या सोबतच महाराजांनी गोपाल काल्याची महती विषद केली. वारकरी संप्रदायात काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतांची शिकवण आणि वारकरी परंपरेचा अंगीकार केल्यास समाज संस्कारी, समृद्ध होईल असे ते म्हणाले. गायनाचार्य वारकरी भूषण महेश्वर भगूरे गुरुजी, कुंदन महाराज बोरसे, रोहिदास महाराज जगदाळे, कृष्णा महाराज गिरी, मृदंगाचार्य दिनेश महाराज भोजाड आणि श्रीहरी महाराज भगूरे आदींची साथ सप्ताहसाठी लाभली. प्रसिद्ध कीर्तनकार पांडुरंग महाराज वावीकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. नगरसूलचा निकम परिवार व उद्धव निकम यांच्या योगदानातून महाप्रसाद व कीर्तन सेवा घडून आली. सप्ताह समितीतर्फे सुभाष निकम, कारभारी अभंग, भाऊलाल कुडके, योगेश गंडाळ, मधुकर निकम, सुदाम गाडेकर यांनी आभार मानले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com