NRS26B02376
नाशिक ः जिल्हास्तरिय विज्ञान मेळाव्यात जिल्हात प्रथम पारितोषिक मिळविलेल्या जय बाबाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
------------
३०-२
नगरसूल येथील विद्यार्थ्यांची
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
-----------
सलग दुसऱ्या वर्षी कामगिरीमुळे जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
नगरसूल, ता.३ ः येथील जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातील विज्ञान मेळाव्यात उत्कृष्ट सादरीकरण करत शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी सलग दुसऱ्यांदा निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे.
‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७- आव्हाने आणि संधी’या विषयावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध व प्रभावी मांडणी केली. भारताच्या भविष्यातील वाढत्या ऊर्जेच्या गरजा,नवीकरणीय ऊर्जा स्रोत,ऊर्जा बचत, आधुनिक तंत्रज्ञान,ऊर्जा स्वावलंबन तसेच ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व संधी यांचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून विषयाची प्रभावी मांडणी केली. विद्यार्थ्यांचे आकलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासपूर्ण मांडणी, वक्तृत्वशैली आणि प्रभावी सादरीकरण यांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
मागील वर्षीही जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द व मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे.
------------