नगरसूल,हडपसावरगाव,कुसमाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

नगरसूल,हडपसावरगाव,कुसमाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
Published on
पान चार --------------- 02379 नगरसूल : तात्यासाहेब कोल्हे यांच्या घरातील साहित्य शेतात नेऊन केलेली उचका पाचक. नगरसूलला दोन ठिकाणी घरफोड्या सोन्या-चांदीचे दागिने लंपास; श्‍वानावर कोयत्याने वार सकाळ वृत्तसेवा नगरसूल ,ता.४: येथील पवार वस्ती तसेच हडपसावरगाव येथील कोल्हे वस्तीवर बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता.३) मध्यरात्री घडली. तसेच परिसरातील आणखी काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच एका ठिकाणी पाळीव श्‍वानावर चोरट्याने कोयत्याने वार केला. पवार वस्तीवरील सहदेव ठकाजी पवार हे पत्नीसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या शेतातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्याची उचकापाचक केली. यामध्ये सुमारे ४० हजार रुपये रोख व आठ ते दहा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. हडपसावरगाव येथील तात्यासाहेब कोल्हे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने ते पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते.चोरट्यांनी शेडचे कुलूप तोडून घरातील लोखंडी पेटी शेतात नेली व तिची उचकापाचक केली. पेटीतील २० हजार रुपये रोख व चार ते पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान, चोरट्यांनी एकाच रात्री परिसरातील अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हडपसावरगाव येथील अमोल सोनवणे यांच्या घरासमोर उभी असलेल्या दुचाकीच्या चाव्याही चोरट्यांनी काढून नेल्या.कुसमाडी येथे नानासाहेब साठे यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. बाळकृष्ण साठे यांच्या घरासमोर चोरट्यांनी प्रवेश केला असता घरातील व्यक्तींना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com