बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे २१ गुंठे जमिनीवर डल्ला

बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे २१ गुंठे जमिनीवर डल्ला
Published on
बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे २१ गुंठे जमिनीवर डल्ला मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याच्या कुटुंबाची फसवणूक; दोघांवर गुन्हा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी केलेल्या जमिनीवर बनावट संमतीपत्र आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या जोरावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कौटुंबीक हतबलतेचा गैरफायदा घेत, संशयितांनी त्यांच्या ४० गुंठे जमिनीपैकी तब्बल २१ गुंठे जागेतून चक्क १२ मीटरचा रस्ता मंजूर करून घेतला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -- चंद्रकांत नथू धामणे आणि कौस्तुभ चंद्रकांत धामणे (दोघे रा. जुनी पंडित कॉलनी, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. सायली प्रशांत मोहाडकर (वय ४१, रा. जुनी पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी २०१६ मध्ये त्र्यंबकेश्‍वरजवळील मौजे झारवड बुद्रुक येथे गट नंबर १०१ मध्ये ४० गुंठे जमीन खरेदी केली होती. पती मर्चंट नेव्हीत असल्याने आणि कुटुंब नाशिकमध्ये राहत असल्याने त्यांना या जमिनीची नियमित देखभाल करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आर्थिक गरजेपोटी त्यांनी ही जमीन सप्टेंबर २०२५ मध्ये दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. खरेदीदारांनी जेव्हा या जागेचा विकास करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांना शेजारीच इमारत बांधणाऱ्या धामणे पिता-पुत्रांच्या बांधकाम नकाशात एक धक्कादायक बाब आढळून आली. नगररचना विभागातून माहिती काढली असता, मोहाडकर यांच्या मालकीच्या जमिनीतून थेट १२ मीटरचा रस्ता दाखवून त्याला मंजुरी मिळवण्यात आली होती. अधिक चौकशी केली असता, संशयित धामणे याने ऑगस्ट २०२२ मध्ये १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करून त्यावर मोहाडकर कुटुंब आणि इतर शेजाऱ्यांची बांधकामास हरकत नाही अशी संमती असल्याचे दर्शवले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहाडकर यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. प्राथमिक चौकशीत फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडाविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्याकडे गुन्हा तपासाकामी वर्ग करण्यात आला आहे. --- असा झाला भांडाफोड स्टॅम्प पेपरवर आणि वाणिज्यिक ले-आउटच्या कॉपीवर सायली मोहाडकर व त्यांच्या सासूच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. मोहाडकर यांनी या सह्यांची पडताळणी खासगी फॉरेन्सिक कन्सलटन्सीच्या माध्यमातून केली असता, त्या स्वाक्षऱ्या पूर्णपणे बनावट असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला. -- ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com