कार्यकारी मंडळाच्या तीन उमेदवारांनी माघार घेताच चुरशीला पूर्णविराम

कार्यकारी मंडळाच्या तीन उमेदवारांनी माघार घेताच चुरशीला पूर्णविराम
Published on
कार्यकारी मंडळाच्या तीन उमेदवारांनी माघार घेताच चुरशीला पूर्णविराम नाशिक एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाहांसह सर्व पदे बिनविरोध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या बुधवारी (ता. १६) अंतिम दिवशी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या ‘बिनविरोध’ निवडीच्या प्रयत्नांना यश आले. कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी दाखल झालेल्या अकरा अर्जांपैकी अभिजित दुसाने, राजा वर्टी आणि अजिंक्य साने यांनी माघार घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपली. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह तसेच कार्यकारी मंडळ आणि शिक्षक मंडळाच्या सर्व जागांवर निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या यापूर्वीच्या बहुसंख्य निवडणुकाही काही अपवाद वगळता बिनविरोध झाल्या आहेत. अनेक वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे (कै.) प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या निधनानंतरची ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. अध्यक्षपदी दिलीप फडके, उपाध्यक्षपदी चंद्रशेखर मोंढे व जयदीप वैशंपायन, तर कार्यवाहपदी राजेंद्र निकम यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी अकरा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, माघारीच्या अंतिम दिवशी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूकही बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेले कार्यकारी मंडळ सदस्य : मैथिली गोखले, लक्ष्मण जाधव, देवदत्त जोशी, सरोजिनी तारापूरकर, डॉ. मनीष बापये, पंढरीनाथ बिरारी, सचिन महाजन आणि कृष्णभूषण महाशब्दे. शिक्षक मंडळ सदस्यपदासाठी मुख्याध्यापक प्रतिनिधी माध्यमिक शाळा या चार जागांसाठी शरद शेळके, राजेंद्र कापसे, गंगाधर बदादे, नंदिनी कहांडळ आणि डॉ. लक्ष्मी कस्तुरे; उपमुख्याध्यापक प्रतिनिधी माध्यमिक शाळा या तीन जागांसाठी सूर्यभान जगताप, साहेबराव राठोड आणि फरहत शेख यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून उमेश कुलकर्णी, डॉ. शैलेश पाटोळे, विजया दुधारे, श्वेता देशपांडे, अनुराधा घोडेराव, दिनेश देवरे, मंगला मोरे आणि दयावंती मते, तर शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून अमोल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तमराव गांगुर्डे, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मधुकर कांगणे यांनी काम पाहिले. रहाळकरांची २३ वर्षांची कारकीर्द (कै.) ॲड. मधुकर तोष्णीवाल यांच्यानंतर (कै.) प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी तब्बल २३ वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. २०२३ मध्ये त्यांच्या निधनानंतर झालेल्या दोन्ही निवडणुकांत विद्यमान अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर सदस्यांनी विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या इतिहासात सलग चार वेळा कार्यवाहपदी निवड होणारे राजेंद्र निकम हे पहिलेच उमेदवार ठरले असून, यापैकी तीन निवडणुकांत त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com