कुंभमेळा कामांत एक चूक दाखवा; मी नाव बदलेन!

कुंभमेळा कामांत एक चूक दाखवा; मी नाव बदलेन!
Published on
कुंभमेळा कामांत एक चूक दाखवा; मी नाव बदलेन! आयुक्त मनीषा खत्री यांचे टीकाकार व सोशल मीडिया हँडलर्सना खुले आव्हान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या कामांवर टीका करणाऱ्यांना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी खुले आव्हान दिले. ‘कुंभमेळ्याच्या कामांमध्ये एक तरी चूक काढून दाखवा; मी माझे नाव बदलेन,’ अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांसह सोशल मीडिया हँडलर्सना प्रत्युत्तर दिले. कुंभमेळ्यासंदर्भातील महापालिकेच्या कामांमध्ये कोणतीही अनियमितता अथवा त्रुटी नसल्याचा ठाम दावा आयुक्त खत्री यांनी केला. महापालिकेने आतापर्यंत काढलेल्या सर्व निविदा प्रक्रियेची कागदपत्रे वेबसाइटवर उपलब्ध करून दिली असून, ज्यांना या प्रक्रियेबाबत शंका असेल त्यांनी ती कागदपत्रे डाऊनलोड करून तपासावीत, असे आवाहनही त्यांनी केले. ‘निविदाप्रक्रिया, अंदाजपत्रके, कामांची गुणवत्ता याबाबत महापालिका पूर्णपणे पारदर्शक आहे. आम्ही कुठे चुकीचे आहोत, हे कोणीही पुराव्यानिशी दाखवून द्यावे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कोणतेही चुकीचे काम झालेले नाही,’ असे खत्री यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयआयटी पवईच्या अभियंत्याने नुकतीच महापालिका हद्दीतील कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. या कामांची गुणवत्ता व मजबुती पाहून अशा प्रकारच्या कामांची ‘मजबुती’ यापूर्वी कुठेही पाहिली नसल्याचे संबंधित अभियंत्याने सांगितल्याचा दावा आयुक्त खत्री यांनी केला. ‘आमच्या कामांमध्ये कुठेही कमतरता नाही आणि ती होऊही दिली जाणार नाही,’ असे आश्वासन देत कुंभमेळ्याच्या कामांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही आयुक्त खत्री यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com