महापालिका ऊर्जा सर्वेक्षण

महापालिका ऊर्जा सर्वेक्षण
Published on
पान तीन -------------- राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकासाठी मनपाला माहिती सादरीकरणाचे निर्देश सबहेड ''महाऊर्जा''चे पालिका आयुक्तांना पत्र; ऊर्जा बचतीचा लेखाजोखा मागवला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा दक्षता ब्युरो दरवर्षी देशातील सर्व राज्यांच्या ऊर्जा संवर्धनातील कामगिरीचे मूल्यमापन करून राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक जाहीर करते. या निर्देशांकासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबवण्यात आलेल्या ऊर्जा बचत व संवर्धन उपक्रमांची माहिती तातडीने पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने केले असून नाशिक महापालिकेलाही याबाबत कळवण्यात आले आहे. महाऊर्जाच्या महासंचालकांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पालिकेच्या विविध विभागांमार्फत हाती घेण्यात आलेल्या वीज बचत प्रकल्पांची, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या उपाययोजनांची, धोरणात्मक उपक्रमांची आणि संबंधित मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. केंद्र शासनाकडून इमारत, उद्योग, नगरपालिका व महानगरपालिका, वाहतूक, शेती, वीज वितरण कंपन्या आणि क्रॉस सेक्टर अशा सात प्रमुख क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारे राज्यांचे मूल्यमापन केले जाते. या क्षेत्रांमध्ये राबवलेले प्रकल्प, हाती घेतलेल्या उपाययोजना, घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि त्यातून प्रत्यक्षात झालेली वीज बचत यांचा एकत्रित लेखाजोखा विचारात घेऊन राज्यांची क्रमवारी निश्चित होते. त्यामुळे नाशिक महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची अचूक माहिती महाऊर्जाला देणे आवश्यक ठरले असून संबंधित विभागांना माहिती संकलनासाठी तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे. --------- महाराष्ट्रास पाच पुरस्कार ऊर्जा संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांचा दरवर्षी १४ डिसेंबर रोजी ''राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना''निमित्त राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध शासकीय विभागांनी राबवलेल्या प्रभावी उपक्रमांच्या बळावर महाराष्ट्राने यापूर्वी तब्बल पाच वेळा हा प्रतिष्ठित राष्ट्रीय बहुमान पटकावला आहे. यंदाही राज्याची आघाडी कायम राहावी, यासाठी महाऊर्जाने विविध विभागांकडून माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com