घरपट्टी वसुली ठप्प

घरपट्टी वसुली ठप्प
Published on
एन्कर --------- जनगणनेच्या कामात कर्मचारी गुंतल्याने घरपट्टी वसुली ठप्प थकबाकी ८५१ कोटींवर; मागील थकबाकीपैकी फक्त पाच टक्के वसूल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : ‘एसआयआर’ आणि जनगणनेच्या जबाबदारीत महापालिकेचे कर वसुली कर्मचारी गुंतल्याने घरपट्टी वसुलीचे काम जवळपास थांबले आहे. परिणामी चालू कर आणि मागील थकबाकी मिळून महापालिकेचे एकूण ८५१.५८ कोटी रुपये थकले आहेत. यामध्ये मुदतीत घरपट्टी न भरल्यामुळे दरमहा दोन टक्के दराने आकारण्यात आलेल्या शास्तीची रक्कमच ४३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एसआयआरची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी करवसुली विभागातील १८६ पैकी सुमारे १६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वसुली यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. महापालिका हद्दीत सहा लाख ३७ हजार ६६५ मिळकती असून त्यांच्याकडून घरपट्टी वसूल केली जाते. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी चालू घरपट्टीपोटी २३५ कोटी आणि मागील थकबाकीपोटी ७५६ कोटी असे एकूण ९९२ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. एप्रिल ते जून या कालावधीत राबविलेल्या करसवलत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, १ एप्रिल ते ९ सप्टेंबरअखेर महापालिकेला घरपट्टीतून १४०.७० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत एकूण उद्दिष्टाच्या केवळ १४ टक्के वसुली होऊ शकली आहे. चालू मागणीच्या ४४ टक्के वसुली झाली असली तरी मागील थकबाकीपैकी फक्त पाच टक्के रक्कमच वसूल होऊ शकली आहे. ---चौकट सिडकोत सर्वाधिक वसुली थकबाकीमध्ये मागील ७१८.६५ आणि चालू १३२.९२ कोटी रुपयांचा समावेश आहे. विभागनिहाय विचार करता सिडको विभागात ३०.४४ कोटी रुपयांची सर्वाधिक वसुली झाली असून, त्याखालोखाल पंचवटीत २६.४५, नाशिक पश्चिमेमध्ये २३.२०, नाशिक पूर्वमध्ये २२.२७, नाशिक रोड २१.६३ आणि सातपूरमध्ये १६.६९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. थकबाकी वसुलीसाठी शास्तीचा बोजा कमी करणारी अभय योजना लागू करण्याची मागणी होत असून, अशी योजना आल्यास थकबाकीदारांना रक्कम भरणे सुलभ होणार आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com