गंगापूर रोड समांतर रस्त्याला मंजुरी

गंगापूर रोड समांतर रस्त्याला मंजुरी
Published on
पान तीन मेन (समर्पक किल्पआर्ट वापरावे) ------------------------ सिंहस्थसाठी गंगापूर रोडला पर्यायी मार्ग ६५ कोटी ९१ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाला बळ मिळाले आहे. महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज उजवा तट कालवा रस्ता विकास आणि त्यावरील विद्युतवाहिनी स्थलांतरण या दोन कामांसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने ६५ कोटी ९१ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी केला आहे. गेल्या चार वर्षांपासून उपमहापौर विलास शिंदे रस्ता रुंदीकरणासाठी शासन दरबारी प्रयत्न करत होते. गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज पर्यंत उजवा तट कालवा रस्ता विकासासाठी ५६.९१ कोटी रुपये, तर महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज उजवा तट कालवा रस्त्यावरील विद्युतवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी ९ कोटी रुपये अशी एकूण ६५.९१ कोटींची तरतूद आहे. ही दोन्ही कामे मार्च २०२७ अखेर किंवा आवश्यकतेप्रमाणे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेने भोसला महाविद्यालय ते कबीर नगर झोपडपट्टी मार्गे बारदान फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ६६ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला होता. बारदान फाटा ते अशोक स्तंभ या गंगापूर रोडवर भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पर्यायी मार्ग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सध्या नऊ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याचे १५ मीटरपर्यंत रुंदीकरण, कबीर नगर भागात तात्पुरत्या स्वरूपात १२ मीटर रुंदीकरणाचे नियोजन त्यात होते. आनंदवली आणि पाइपलाइन रोड भागातील वाढत्या नागरी वसाहतींमुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक ठप्प होऊन त्याचा ताण आनंदवली मार्गे गंगापूर रोडवर येतो. महात्मा नगर ते मोतीवाला कॉलेज कालवा रस्ता विकसित झाल्यास गंगापूरकडून महात्मा नगर आणि कॉलेज रोडकडे येणाऱ्या वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. -------------- मार्च अखेरीस कामे पूर्ण होणार गंगापूर उजवा तट कालवा रस्त्याला मंजुरी मिळाल्याने गंगापूर रोड वरील वाहतुकीवरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सदरचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (विलास शिंदे फोटो घ्यावा) गंगापूर रोडवरील वाहतुकीचा ताण लक्षात घेता समांतर असलेल्या या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता शासनाने दखल घेऊन निधी मंजूर केला आहे आता काम तातडीने पूर्ण होऊन सिंहस्थापूर्वी सदरचा रस्ता वापरात येईल. - विलास शिंदे, उपमहापौर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com