गणेश विसर्जन तलावांची यादी जाहीर

गणेश विसर्जन तलावांची यादी जाहीर
Published on
विसर्जनासाठी ७७ स्थळांची यादी जाहीर ४० कृत्रिम, १९ नैसर्गिक तर १८ ठिकाणी दुहेरी सुविधा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने यंदा विसर्जन स्थळांची यादी अगोदरच प्रसिद्ध केली आहे. शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी गोदाघाटांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर एकूण ७७ विसर्जन स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये ४० ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार असून १९ ठिकाणी नैसर्गिक स्थळांवर विसर्जन करता येणार आहे. तर १८ ठिकाणी नैसर्गिक स्थळासोबतच कृत्रिम तलावाची दुहेरी सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. निश्चित करण्यात आलेल्या नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये नाशिक पूर्व विभागातील लक्ष्मीनारायण घाट, कन्नमवार पूल घाट, रामदासस्वामी घाट आणि नंदिनी गोदावरी संगमाचा समावेश आहे. नाशिक पश्चिम विभागात यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, टाळकुटेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट आणि अशोकस्तंभावरील हनुमान घाट येथे नैसर्गिक विसर्जनाची सोय असेल. पंचवटी विभागात रामतीर्थ परिसर, म्हसरूळ येथील सीता सरोवर, नांदूर मानूर गोदावरी पूल, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल दरम्यानचा पट्टा, आडगाव पाझर तलाव आणि तपोवन येथील कपिला संगम ही स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. नाशिक रोड विभागात दसक घाट गोदावरी नदी, चेहेडी गावची दारणा नदी, देवळाली गाव, विहितगाव आणि वडनेरगाव येथील वालदेवी नदी ही स्थळे असतील. सातपूर विभागात गंगापूर धबधबा, सोमरेश्वर मंदिर, चांदशी पूल, आसाराम बापू पूल आणि आयटीआय पुलाजवळील जागा नैसर्गिक विसर्जनासाठी निश्चित करण्यात आली आहे. कृत्रिम तलावांच्या माध्यमातून विसर्जनासाठी नाशिक पूर्वेत लक्ष्मीनारायण घाट, कन्नमवार पूल, रामदासस्वामी मठाजवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, राणेनगरमधील शारदा शाळेसमोर आणि कलानगर चौकातील राजसारथी सोसायटी येथे सुविधा उपलब्ध असेल. पश्चिम विभागात चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनीतील परीचा बाग, फॉरेस्ट नर्सरी पूल, येवलेकर मळ्यातील बॅडमिंटन हॉल आणि दोंदे पूल येथील म्हसोबा मंदिराजवळ कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. पंचवटीत वाघाडी नदीवरील राजमाता मंगल कार्यालय, कोणार्कनगर, म्हसरूळ सीता सरोवर, तपोवन कपिला संगम, रासबिहारी शाळेसमोरील प्रमोद महाजन उद्यान परिसर, रामवाडी चिंचबन, कमलनगर आणि रोकडोबा सांडवा ते गौरी पटांगण परिसरात ही सुविधा असेल. नाशिक रोडमध्ये नारायणबापू चौक, राजराजेश्वरी चौक, चेहडी ट्रक टर्मिनस, जयभवानी रोडवरील निसर्गोपचार केंद्र, शिखरेवाडी मैदान, आर्टिलरी सेंटर रोडवरील गाडेकर मळा आणि महापालिका शाळा क्रमांक १२५ येथे कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ---चौकट सिडको विभागातील नियोजन सिडको विभागात पवननगर जलकुंभ, गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, जुन्या सिडकोतील राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, कर्मयोगीनगरमधील राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ, अश्विननगरमधील राजे संभाजी स्टेडियम, अंबड पोलिस ठाणे, कामटवाड्यातील मिनाताई ठाकरे शाळा, हिरे शाळेजवळील पवननगर जलकुंभ, रामनगरमधील डे-केअर शाळा, गामणे मैदान, वासननगर, पाथर्डीतील अंजना लॉन्स, पिंपळगाव खांब आणि वालदेवी घाट येथे सुविधा उपलब्ध होईल. सातपूरमध्ये गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, आसाराम बापू पूल, पाइपलाइन रोड, शिवाजीनगरमधील सूर्यामर्फी चौक, अशोकनगर पोलिस चौकीसमोर, अंबड लिंक रोडवरील नंदिनी पुलाजवळ, आयटीआय पुलाजवळ, पपया नर्सरीजवळ आणि पिंपळगाव बहुला येथे कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com