स्वाइन फ्लू चा वाढता धोका

स्वाइन फ्लू चा वाढता धोका
Published on
मुख्य अंक पान ३ ------------ डेंगी- स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव --- अकरा दिवसांत स्वाइन फ्लूचे ८४, डेंगीचे ३० नवे रुग्ण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ ः पावसाने उघडीप दिल्यावर ऐन सणासुदीच्या काळात शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, डेंगीपाठोपाठ स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या अकरा दिवसांतच स्वाइन फ्लूचे ८४ नवे रुग्ण आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या २३१ वर पोहोचली आहे. या आजारामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, महापालिका हद्दीतील दोन आणि ग्रामीण भागातील तीन रुग्णांचा समावेश आहे. याच अकरा दिवसांत डेंगीचे ३० नवे रुग्ण आढळल्याने डेंगीबाधितांचा आकडा १३१ वर गेला. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. ------------- स्वाइन फ्लू हा ‘एच १ एन १’ इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसनविकार असून, खोकला किंवा शिंकेतून हवेमार्फत त्याचा संसर्ग वेगाने पसरतो. हवामान बदलाच्या काळात तसेच पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्याने हा विषाणू अधिक काळ जिवंत राहत असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैमध्ये २१ जणांना लागण झाली, ऑगस्टमध्ये ही संख्या ११९ वर पोहोचली. सप्टेंबरच्या पहिल्या अकरा दिवसांत ८४ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या २३१ झाली आहे. डेंगीच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत डेंगीचे ५६ रुग्ण होते. ऑगस्टमध्ये एकट्या ४५ नव्या रुग्णांची नोंद झाली; तर सप्टेंबरच्या अकरा दिवसांत आणखी ३० जणांना डेंगीची लागण झाली आहे. डेंगी, स्वाइन फ्लू, चिकनगुण्या आणि मलेरिया यांसारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रोग नियंत्रणासाठी वैद्यकीय विभागाने शहरभर तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ८३ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत २० हजार घरांना भेटी देण्यात आल्या असून, ८३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १५६ तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. पथकांनी २८ हजार पाणीसाठ्यांची तपासणी केली असता ५९० ठिकाणी डेंगीच्या अळ्या आढळून आल्या असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. ----------- चौकट------- १६-१ गणेशोत्सवात स्वाइन फ्लूचा धोका गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, खोकताना-शिंकताना रुमाल वापरा, ताप- सर्दी- खोकला असल्यास गर्दीत जाणे टाळा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, मंडपांमध्ये स्वच्छता राखा, पिण्याच्या पाण्याची व हवेशीर जागेची व्यवस्था ठेवा, हस्तांदोलनाऐवजी नमस्कार करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com