शहरात 347 गणेश मंडळ

शहरात 347 गणेश मंडळ
Published on
महापालिकेकडून ३४७ मंडळांना अंतिम परवानगी १३६ अर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात; २६० मंडळ प्रलंबित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या एक खिडकी योजनेंतर्गत यंदा शहरातील ३४७ सार्वजनिक मंडळांना अंतिम परवानगी देण्यात आली आहे. उत्सवाला प्रारंभ झाल्यानंतरही पोलिस, अग्निशमन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ना- हरकत दाखल्यांअभावी २६० मंडळांचे अर्ज प्रलंबित आहेत, तर १३६ अर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून यंदा मंडप धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार उत्सवाच्या महिनाभर आधी परवानगी घेण्याचे बंधन घालण्यात आले होते. सहाही विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना कार्यान्वित करून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र मंडळांकडून अर्ज दाखल करण्यास यंदाही विलंब झाला. एकूण १३०० अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आणि बहुतांश ठिकाणी दुबार अर्ज दाखल झाल्याने ५५७ अर्ज रद्द करण्यात आले. विभागनिहाय विचार करता नाशिक पूर्व विभागात १७६ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ९४ रद्द होऊन ३३ मंडळांना अंतिम परवानगी मिळाली. नाशिक पश्चिमेमध्ये १७४ पैकी ९३ अर्ज रद्द होऊन ५५ मंडळांना परवानगी देण्यात आली. पंचवटी विभागात सर्वाधिक २९६ अर्ज आले होते, त्यातील १२७ रद्द होऊन ८६ मंडळांना मंजुरी मिळाली. नवीन नाशिकमध्ये २४२ पैकी १०२ अर्ज रद्द होऊन ६०, सातपूरमध्ये २९० पैकी ११३ अर्ज रद्द होऊन ७०, तर नाशिक रोडमध्ये १२२ पैकी २८ अर्ज रद्द होऊन ४३ मंडळांना अंतिम परवानगी देण्यात आली आहे. --चौकट टप्प्याटप्प्याने परवानगी रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणाच्या त्रासामुळे अनेक मंडळांनी सुरुवातीला अर्ज प्रक्रियेकडे पाठ फिरवली होती. महापौर हिमगौरी आडके यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समजूत काढल्यानंतर अर्जांचा ओघ वाढल्याचे सांगण्यात येते. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या मंडळांना टप्प्याटप्प्याने परवानगी देण्यात येत असल्याचे उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com