रस्ते कामांची पाहणे

रस्ते कामांची पाहणे
Published on
फोटो : B04962 नाशिक : प्रयोगशाळेची पाहणी करताना आयआयटी तज्ज्ञ. -- रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी ‘आयआयटी’चे सहकार्य मनपाच्या प्रयोगशाळेची तज्ज्ञांकडून पाहणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : शहरातील रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिकेने आता थेट आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांची मदत घेतली आहे. शुक्रवारी (ता. १७) आयआयटी बॉम्बे येथील तज्ज्ञांच्या पथकाने महापालिकेच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी डांबरी रस्त्यांचे काम सुरू करण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या विविध तांत्रिक चाचण्यांची प्रक्रिया, त्यातील बारकावे आणि निष्कर्ष कसे काढले जातात याचा सविस्तर आढावा घेतला. प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या पाहणी दौऱ्यावेळी महापालिकेचे विभागप्रमुख तथा कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. तज्ज्ञांनी या वेळी डांबर मिश्रणाची घनता तपासण्याची चाचणी, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसद्वारे मिश्रणातील घटकांचे आणि पोकळ्यांचे प्रमाण तपासणे, तसेच मार्शल स्टॅबिलिटी चाचणीद्वारे रस्त्याचे मिश्रण किती भार पेलू शकते याची तपासणी या महत्त्वाच्या चाचण्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या चाचण्यांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे भविष्यातील रस्ते अधिक टिकाऊ आणि दर्जेदार होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com