विषय समिती निवडणूक

विषय समिती निवडणूक
Published on
समित्या सभापती निवडणुकीचा मार्ग मोकळा पुढील आठवड्यात मतदानाची शक्यता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : महिला बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय साहाय्य व आरोग्य, विधी आणि शिक्षण या पाच महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकांसाठी नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर हिमगौरी आडके यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत या पाचही समित्यांवरील सदस्य नियुक्ती जाहीर केली होती. पक्षीय संख्याबळानुसार झालेल्या या नियुक्त्यांमध्ये सत्तारूढ भाजपने वर्चस्व मिळवले असून नऊ सदस्यांच्या प्रत्येक समितीत भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, तर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विधी समितीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवकाचा समावेश करण्यात आला आहे. सदस्य नियुक्तीचा ठराव महापौरांकडून प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विभागाने सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. परंपरेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाईल आणि माघारीची प्रक्रिया प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी होईल. एकापेक्षा अधिक अर्ज शिल्लक राहिल्यास मतदान घेतले जाईल, मात्र पाचही समित्यांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुका बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com