गॅस सिलेंन्डरसाठी नागरिकांची धावपळ

गॅस सिलेंन्डरसाठी नागरिकांची धावपळ
Published on
मेन गॅस सिलिंडर हवा, मग वीस दिवस थांबा ! वितरणातील गोंधळामुळे नोंदणीनंतरही प्रतीक्षा; ग्राहकांचा जीव मेटाकुटीला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : शहर व परिसरातील घरगुती एलपीजी ग्राहकांना नोंदणी करूनही वीस, वीस दिवस सिलिंडरसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ग्राहक हातातील कामे सोडून गॅस वितरकांकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, तेथेही त्यांना मिळत नसल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. एकीकडे प्रशासन मुबलक साठा असल्याचा दावा करते, परंतु नोंदणीनंतरही दोन, दोन आठवडे सर्वसामान्यांंना गॅस सिलिंडरसाठी तिष्ठत राहावे लागत आहे. दिवसाला साधारण २६ ते २७ हजार सिलिंडरची मागणी नोंदवली जाते. मध्य-पूर्व आखाती देशांमधील युद्धाला अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या युद्धाचा थेट परिणाम एलपीजी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवर झाला आहे. त्यामुळे शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या नोंदणी प्रक्रियेत बदल करताना हा कालावधी २५ दिवसांचा केला आहे. ग्रामीण भागात परिसरानुसार त्यात बदल केले असून, ग्राहकांना वेळेत गॅस सिलिंडर उपलब्ध केले जाईल, असा दावा शासन करत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शहरी भागात गॅस सिलिंडरसाठी नोंदणी करूनही ग्राहकांना वीस, वीस दिवस प्रतीक्षा करावी लागते आहे. या दरम्यान, गॅस वितरकांकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पूर्वीप्रमाणे सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ----- प्रशासन म्हणते, मुबलक साठा जिल्हा पुरवठा विभागातर्फे आजच्या घडीला जिल्ह्याच्या गरजेनुसार आवश्‍यक तेवढा सिलिंडरचा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, घरगुती ग्राहकांना नोंदणी करूनही दोन, दोन आठवडे सिलिंडर मिळत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच आता रस्त्यावर उतरून ग्राहकांचे होणारे हाल कमी करणे आवश्‍यक आहे. --- ५० ची मर्यादा * दिवसाला साधारणतः २६ ते २७ हजार सिलिंडरची मागणी * डिलिव्हरी बॉयकडून यापूर्वी एका दिवसाला ६० ते ७० घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण * गॅस वितरण कंपन्यांच्या नवीन नियमानुसार दिवसभरात ५० सिलिंडरचे वाटप * एकूण डिलिव्हरी बॉयपैकी १० ते १५ टक्के व्यक्तीकडून दिवसाला ५० हून अधिक सिलिंडर वितरण * एक समानतेवर आणण्यासाठी ५० सिलिंडरची मर्यादा कंपन्यांनी आखली --- ---गृहिणींना सर्वाधिक त्रास * ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करूनही सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने गृहिणींना सर्वाधिक त्रास * गॅस सिलिंडरअभावी स्वयंपाक रखडत असल्याने घरातील सर्वच सदस्यांना थेट फटका * नोकरी- व्यवसाय सांभाळून घरातील कर्त्या पुरुषांचे हेलपाटे. * सिलिंडर मिळेलच याची शाश्‍वती नाही * ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना घाम ---- कंपनीनिहाय गॅस सिलिंडर वितरण तारीख..........बीपीसीएल..........आयओसीएल..........एचपीसीएल.......... ५ मे...........१६३१२..........२३७०..........८१३७..........२६८१९ ६ मे..........१९२५२..........१९७४..........१०८८८..........३२११४ ७ मे..........१६५७४..........३७१७..........११६१५..........३१९०६ ८ मे..........१४०७८..........२२१०..........९६११..........२५८९९ ९ मे..........१४८२४..........२२७०..........१०६८४..........२७७७८ ११ मे..........९९६६..........१५३०..........२१८४९..........३३३४५ १२ मे.........९०७०..........६७२..........१६२०७..........२५९४९ १३ मे..........१०९०५..........२३५८..........अपात्र..........१३२६३ ----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com