अवतीभवती

अवतीभवती
Published on
फोटो : H19121, H19122 तालाभिषेक बैठक रंगणार रविवारी नाशिक : पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ फाऊंडेशन आयोजित तालाभिषेक बैठक रविवारी (ता. १७) रंगणार आहे. दर दोन महिन्यांनी आयोजित बैठकीत पुण्याचे युवा तबलावादक ईशान परांजपे यांचे एकल तबला वादन होईल. त्यांना प्रतीक पंडित (संवादिनी) साथ करतील. मैफलीच्या उत्तरार्धात शास्त्रीय गायक डॉ. आशिष रानडे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना सुजित काळे (तबला) आणि दिव्या रानडे (संवादिनी) साथ करतील. याप्रसंगी अमृता व विवेकानंद रणदिवे, अभिजित हडप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. उपक्रमातील ही अकरावी बैठक असून कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सायंकाळी सहाला मैफल रंगणार आहे. कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला असून रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नितीन पवार, रघुवीर अधिकारी यांनी केले आहे. ------------------- फोटो : H19117 मारुती स्तोत्रात यथार्थ दर्शन : वाणी नाशिक : समर्थ रामदासांनी लिहिलेल्या मारुतीचे गुणगान करणारी एकूण तेरा स्तोत्रे आहेत. समर्थांच्या सर्वसामान्य भक्तांना माहीत असणाऱ्या ‘भीमरूपी महारुद्रा’ या स्तोत्रात भक्तिरूप मारूतीचे यथार्थ दर्शन घडत असल्याचे विचार लेखिका रजनी वाणी यांनी मांडले. गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही उपक्रमात त्या बोलत होत्या. हुतात्मा स्मारकात मंगळवारी (ता. १२) संवाद झाला. ओमप्रकाश शर्मा अध्यक्षस्थानी होते. विवेचनात्मक प्रभावी मारुती स्तोत्र पुस्तकावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मारुती स्तोत्राच्या पठणाने भक्तांना लाभ होतो. अंतःकरणात श्रद्धा ठेवून स्तोत्र पठण केल्यास आत्मशक्ती जागृत होते. या स्तोत्रात समर्थांनी मारुतीरायाच्या जीवनातील विविध गोष्टी सांगितल्या आहेत. सांसारिक जीवनात स्थैर्य प्राप्त करण्यासाठी या स्तोत्रातील भावना महत्त्वपूर्ण आहेत, असे सांगत त्यांनी मारुती स्तोत्राचे विश्लेषण केले. कविता कासार आणि सुनंदा पाटील यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरवातीला सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी जितेंद्र मालवीय यांच्या अपघाती निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुशीला पिंपरीकर यांनी स्वागत केले. ----------- फोटो : H19116 सैकत मुजूमदार यांचे रविवारी गायन नाशिक : सूर विश्वास व मसाप जलालपूर शाखा आयोजित सूर विश्वास मैफलीचे ६२वे पुष्प कोलकात्ता येथील तरुण गायक सैकत मुजूमदार गुंफणार आहेत. रविवारी (ता. १७) सकाळी सातला सावरकरनगरजवळील विश्वास गार्डनमध्ये शास्त्रीय संगीताची ही मैफल रंगणार आहे. त्यांना मैफलीत गौरव बॅनर्जी (तबला), कुणाल वर्मा (संवादिनी) साथसंगत करतील. सैकत यांनी बनारस घराण्यातील ख्याल गायकीचा सखोल अभ्यास केला असून त्यांच्या गायकीत ख्याल, भजन तसेच उपशास्त्रीय संगीत प्रकारांचा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com